फसवणूक करीत महिलांना करत होता गर्भवती, 94 मुलांचा ‘बाप’ निघाला हा डॉक्टर

हा डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या महिला रुग्णांच्या शरिरात त्यांना अंधारात ठेवून स्वताचे स्पर्म्स टाकत असे. हा गुन्हा सर्वात पहिल्यांदा या डॉक्टरची मुलगी जैकोबा बेलाईर्ड यांनी समोर आणला.

फसवणूक करीत महिलांना करत होता गर्भवती, 94 मुलांचा 'बाप' निघाला हा डॉक्टर
fertility fraud doctorImage Credit source: social media
Follow us
| Updated on: May 12, 2022 | 7:35 PM

वॉशिंग्टन – एक डॉक्टर (Dr. Donald Klein)चक्क 94 मुलांचा बाप (father of 94 boys)असल्याचे समोर आले आहे. अजूनही या प्रकरणात चकौशी सुरु असून, हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. प्रजननासाठी काम करणारा हा डॉक्टर फसवणुकीने महिलांना गर्भवती करत असल्याचे समोर आले आहे. आपल्याकडे येणाऱ्या महिलांमध्ये तो स्वताचे स्पम्स टाकत असे. या आश्चर्यजनक प्रकारावर नेटफ्लिक्सने एक डॉक्युमेंट्रीही तयार केली आहे. हा सर्व प्रकार अमेरिकेतील इंडियानापोलीस (Indianapolis) 

डॉक्टरच्या मुलीने केला पर्दाफाश

या आरोपी डॉक्टरचे नाव डॉ. डोनाल्ड क्लाइव्ह असे असून, त्याची ही कहाणी सगळ्यांपर्यंत पोहचावी यासाठी नेटफ्लिक्सने आवर फादर (Our Father)नावाची डॉक्युमेंट्री तयार केली आहे. 1970, 1980 च्या दशकात हा डॉक्टर आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या महिला रुग्णांच्या शरिरात त्यांना अंधारात ठेवून स्वताचे स्पर्म्स टाकत असे. हा गुन्हा सर्वात पहिल्यांदा या डॉक्टरची मुलगी जैकोबा बेलाईर्ड यांनी समोर आणला. स्पर्म डोनेशननेच या मुलीचा जन्म झाला होता. एके दिवशी या मुलीने तिची डीएनए टेस्ट केली. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या डॉक्टरपासून झालेले अजून सात बहीणभाऊ तिला आहेत. मात्र त्यांची आई वेगवेगळी आहे.

असा झाला प्रकार उघड

त्यानंतर या सातही जणांनी मिळून आपल्या परिवाराचा पसारा कळण्यासाठी शोध सुरु केला. त्यात त्यांच्या लक्षात आले की, त्यांच्या फॅमिली डॉक्टरट त्याचे स्पर्म्स महिला रुग्णांच्या शरिरात टाकतो आहे. या डॉक्युमेंट्रीत जैकोबा यांनी याबाबत सविस्तरपणे सांगितलेले आहे.

मुलींच्या आणि आयांच्या प्रतिक्रिया 

मैट व्हाईट यांनाही आपण डॉक्टर क्लाईन यांच्यापासून झाल्याचे कळले होते. त्या म्हणतातमला माझ्या आईसाठी फार वाईट वाटते. मैट यांची आई म्हणतेजेव्हा मैटची डीएनए टेस्ट झाली, तेव्हा माझअया तोंडातून पहिल्यांदा आलेले शब्द होते की माझ्यावर 15 वेळा बलात्कार झाला, आणि मला हे समजलेच नाही. डॉक्टर क्लाईन जेव्हा आपल्यावर उपचार करीत असे तेव्हा तो दवाखान्यात एकटाच असे, असेही त्यांनी सांगितले.

केवळ दंड भरुन झाली सुटका

ही प्रकरणे जसजशी समोर येऊ लागली, त्यानंतर कायद्यानुसार क्लाईन याला कोर्टात नेण्यात आले. तेव्हाच्या कायद्यातील तरतुदीनुसार, याबाबत गुन्हेगारी कायद्याची तेव्हा तरतूद नव्हती. त्यानंतर केवळ ४० हजारांचा दंड भरुन त्याची सुटका करण्यात आली होती. 2018 साली इंडियानामध्ये बेकायदेशीर स्पर्म देणाऱ्यांना बेकायदेशीर मानण्यात आले. मात्र अद्यापही याबाबत अमेरिकेत फेडरल लॉ अद्याप झालेला नाही.

एक दोन नव्हे 44 आरोपी डॉक्टर

घरी होणाऱ्या डीएनए टेस्टवरुन हे समोर आले आहे की असे एक दोन नव्हे तर 44 डॉक्टर आहेत, की ज्यांनी आपल्या रुग्णांना स्पर्म्स देऊन गर्भधारणा केलेली आहे.

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.