Pune crime | ‘तुमचे दागिने पिशवीत सुरक्षित ठेवा’, म्हणत वानवडीत जेष्ठ महिलेला लुटले
मॅडम पुढे एका महिलेला मारहाण करता तिचे दागिने काढून घेतले, तुम्ही तुमचे दागिने सुरक्षितपणे काढून ठेवा, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आपले दागिने काढून स्वतः जवळील पिशवीत ठेवले. हीच संधी साधत महिलेची हातातील पिशवी घेत चौघांनी पोबारा केला .
पुणे – शहरात महिलांची फसवणूक करत दागिने लुटण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. ‘मॅडम पुढे एका महिलेला चोरांनी मारहाण करत तिचे सर्व दागिने काढून घेतले आहेत, ‘तुमच्याकडं काही दागिने असतील तर ते काढून ठेवा. असे म्हणत अज्ञात चोरट्यांनी जेष्ठ महिलेला लुटल्याची घटना घडली आहे. ही घटना वानवडीतील चायना ग्रील रेस्टॉरंटजवळ घडली आहे. घटनेत चोरट्यांनी महिलेच्या ६० हजार किमतीच्या दोन सोन्याच्या बांगड्या लांबलेल्या आहेत.
अशी घडली घटना याबाबत वानवडीतील जांभुळकर गार्डन येथील ६० वर्षाच्या जेष्ठ महिलेन वानवडी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी महिला पायी घरी जात असताना , त्याच्या जवळ चौघेजण आले. त्यांनी मॅडम पुढे एका महिलेला मारहाण करता तिचे दागिने काढून घेतले, तुम्ही तुमचे दागिने सुरक्षितपणे काढून ठेवा, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने आपले दागिने काढून स्वतः जवळील पिशवीत ठेवले. हीच संधी साधत महिलेची हातातील पिशवी घेत चौघांनी पोबारा केला .
मोटार व केबल चोरांना अटक दुसरीकडे आंबेगाव तालुक्यातील बागायती भागामध्ये विहिरीतील मोटार व केबल चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने घडत आहे. या वाढत्या घटना रोखण्यासाठी ग्रामस्थानी पुढाकार घेत गस्त घालण्यास सुरु केली. याच परिणाम म्हणजे चोरीच्या तयारीत असलेल्या दोन चोरांना पकडून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की चांडोह गाव परिसरातील नदी काठी मोटार चोरीच्या दोघेजण फिरत असल्याचा असल्याची चाहूल स्थानिक ग्रामस्थांना लागली. याबाबत तत्परता दाखवत ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. पुढे ग्रामस्थांच्या मदतीने अनिस अब्दुल शेख आणि त्याचा एक अल्पवयीन साथीदार या दोन चोरट्याना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांकडून मंचर पोलिसांनी सहा मोटारी व सहा केबल असा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.