धक्कादायक ! पतीनेच दोन साथीदारांसोबत मिळून पत्नीवर केला गँगरेप; कोर्टाने ठोठावली ही शिक्षा

14 डिसेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचा पती दोन व्यक्तींसह घरी आला आणि धमकावून त्याने पत्नीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला. या बलात्काराचा व्हिडिओही स्मार्ट फोनवरून तयार करण्यात आला होता. या घटनेत तिचा पती आरोपींचा साथीदार राहिला होता.

धक्कादायक ! पतीनेच दोन साथीदारांसोबत मिळून पत्नीवर केला गँगरेप; कोर्टाने ठोठावली ही शिक्षा
राजधानी दिल्ली पुन्हा हादरली; एकाच रात्री 2 कॅबचालकांची हत्या
Follow us
| Updated on: Dec 23, 2021 | 8:56 PM

पलामू : झारखंडमधील सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात तिथल्या जिल्हा न्यायालयाने पीडितेच्या पतीसह अन्य दोन आरोपी साथीदारांना प्रत्येकी वीस वर्षांचा तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे. मनटू पोलीस स्टेशनच्या हद्दीतील राहैया गावात हे सामूहिक बलात्कार प्रकरण घडले होते. धक्कादायक म्हणजे पीडितेच्या पतीनेच दोन साथीदारांना सोबत आणून पत्नीवर सामूहिक बलात्कार केला होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्याची गंभीर दखल घेत जिल्हा न्यायालयाने आपला निकाल जाहीर केला.

चतुर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश सहविशेष न्यायाधीश (POCSO कायदा) केपीएन पांडे यांनी हा निकाल दिला आहे. त्यांनी आपल्या निकालात आरोपींना 20 हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. तसेच या प्रकरणातील एका दोषी महिलेला दहा वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने ठोठावलेला दंड न भरल्यास चारही दोषींना प्रत्येकी सहा महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागणार आहे.

धक्कादायक घटनाक्रम

या निर्णयामुळे पतीने घडवून आणलेल्या गँगरेपची धक्कादायक कहाणी समोर आली आहे. पीडितेने मनटू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. तिने 16 डिसेंबर 2016 रोजी केलेल्या आरोपांनुसार, तिने गावातीलच एका तरुणाशी लग्न केले होते. पीडितेचा पती अफजल अन्सारी, नौशाद अन्वर आणि बबलू सिंग उर्फ ​​विक्रम राजा यांनी सामूहिक बलात्कार केला. तसेच या अत्याचाराचा मोबाईलमध्ये व्हिडिओही बनवला. आरोपीपैकी बबलू सिंग हा पंकीचे माजी काँग्रेस आमदार देवेंद्र प्रसाद सिंह उर्फ ​​बिट्टू सिंह यांचा सावत्र भाऊ आहे.

गॅंगरेपचा मोबाईलवर व्हिडीओही बनवला

14 डिसेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचा पती दोन व्यक्तींसह घरी आला आणि धमकावून त्याने पत्नीवर सामूहिक बलात्कार घडवून आणला. या बलात्काराचा व्हिडिओही स्मार्ट फोनवरून तयार करण्यात आला होता. या घटनेत तिचा पती आरोपींचा साथीदार राहिला होता. महिलेने अत्याचाराचा प्रतिकार केला असता त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती. अशा प्रकारे दहशतीखाली पत्नीला सामूहिक बलात्कार करण्यास भाग पाडल्याचे उघडकीस आले.

एफआयआरनुसार, घटनेनंतर तिन्ही आरोपी तेथून पळून गेले. पीडितेने नंतर तिच्या वडिलांना या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी मनटू पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. या प्रकरणात न्यायालयाने आरोपींना पॉक्सो कायद्यांतर्गत दोषी ठरवून शिक्षा सुनावली आहे. चारही दोषी आधीच पलामू सेंट्रल जेलमध्ये कैद आहेत. त्यांना या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्याचा पर्याय खुला आहे. (The husband gangraped his wife along with two others)

इतर बातम्या

Sangli Crime: सांगलीत दोन तरुणी आणि एका तरुणाची विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या, जाणून घ्या नेमके काय घडले?

Kalyan Crime: बापाचे दारुचे व्यसन आणि आईच्या आजाराला वैतागून उचलले टोकाचे पाऊल, कल्याणमधील हाय प्रोफाईल सोसायटीतील हत्येचे रहस्य उलगले

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.