Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ulhasnagar | उल्हासनगरात भररस्त्यावर दोघांना बेदम मारहाण, नेहरू चौकातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल…

हॉटेलमध्ये काम करणारा जुना वेटर मालकाकडे पगार मागण्यासाठी आला असता, यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर याचे रूपांतर मारामारीत झाले असल्याची माहिती कदम यांनी दिलीयं. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मालक आणि वेटर यांच्यातले भांडण मिटवण्यात आले.

Ulhasnagar | उल्हासनगरात भररस्त्यावर दोघांना बेदम मारहाण, नेहरू चौकातील घटनेचा व्हिडीओ व्हायरल...
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 11:10 AM

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) भररस्त्यात आठ ते दहा जणांनी मिळून दोन जणांना बेदम मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडलीयं. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडालीयं. विशेष म्हणजे या मारहाणीचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालायं. मारहाण झाल्याच्या घटनेची पोलिसांकडून देखील आता पुष्टी मिळालीयं. मात्र, असे असले तरीही पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिलीयं. आठ ते दहा जणांनी मिळून दोन व्यक्तींना बेदम मारहाण करूनही पोलिसात (Police) तक्रार दाखल न केल्याने मोठे आर्श्चय व्यक्त केले जातंय.

हॉटेलमधील मारहाणीची व्हिडीओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल

उल्हासनगरच्या कॅम्प 2 मधील नेहरू चौकातील हरदासमल हॉटेलमध्ये मारहाणीची घटना घडलीयं. या हॉटेलमध्ये शुक्रवारी रात्री हा प्रकार घडलायं. याबाबत उल्हासनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांना विचारले असता, या हॉटेलमध्ये काम करणारा जुना वेटर हा मालकाकडे पगार मागण्यासाठी आला होता. या दरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यासंदर्भात अजूनही कोणीही तक्रार दाखल केली नसल्याचे सांगितले जात आहे.

हे सुद्धा वाचा

हॉटेल मालक आणि वेटरमधील जुन्या वादातून झाली मारहाण

हॉटेलमध्ये काम करणारा जुना वेटर मालकाकडे पगार मागण्यासाठी आला असता, यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर याचे रूपांतर मारामारीत झाले असल्याची माहिती कदम यांनी दिलीयं. दरम्यान, पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर मालक आणि वेटर यांच्यातले भांडण मिटवण्यात आले. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसून कोणीही याबाबत तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले.

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.