Nashik| वृद्धेच्या गळ्यावर चाकू ठेवून हिरेजडीत दागिने लुटले; 3 कोऱ्या चेकवर सह्याही घेतल्या

सलग झालेले तीन खून, सलग पडलेले तीन दरोडे आणि त्यानंतर सुरू असणाऱ्या लुटमारी थांबण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत.

Nashik| वृद्धेच्या गळ्यावर चाकू ठेवून हिरेजडीत दागिने लुटले; 3 कोऱ्या चेकवर सह्याही घेतल्या
सीसीटीव्ही कैद झालेला संशयित.
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 9:32 AM

नाशिकः अध्यात्मिक अधिष्ठान असलेली, पर्यटकांना भुरळ घालणारी आणि उद्योगांना नेहमी आकर्षण ठरलेल्या नाशिकनगरीमधील गुन्ह्यांचा चढता आलेख मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. सलग झालेले तीन खून, सलग पडलेले तीन दरोडे आणि त्यानंतर सुरू असणाऱ्या लुटमारी थांबण्यात पोलीस अपयशी ठरत असून, आता एका वृद्धेच्या घरात घुसून, तिच्या गळ्यावर चाकू ठेवत हिरेजडीत सोन्याच्या अंगठ्यासह दागिने पळविल्याची घटना घडली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ही गोदाकाठची नगरी हादरून गेली आहे.

नेमका कसा घडला प्रकार?

नाशिकमधील होलाराम कॉलनीतील संचेती पार्क अव्हेन्यू येथे भर दुपारी तीन वाजता ही घटना घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पद्मा केला यांच्या घरात दुपारी तीन वाजता त्यांची घरकाम करणारी बाई आली. त्यांनी तिला साफसफाई करण्यास सांगितले. मात्र, काही वेळातच पुन्हा दरवाजाची बेल वाजली. त्यावेळी एक जॅकेट घातलेला तरुण बाहेर उभा होता. दरवाजा उघडताच त्याने कुरिअर असल्याचे सांगितले. तो बळजबरीने आत घुसला. तुमच्या ओटीपीवर एक नंबर आला आहे, असे सांगितले. केला या मोबाईल पाहत असताच त्याने त्यांच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला. तरुणाने वृद्ध केला यांच्या गळ्याला चाकू लावला. त्यांच्या हातातल्या हिरेजडीत अंगठ्या काढून घेतल्या.

कोऱ्याचेकवर सह्या

तरुणाने घरात पैसै कुठे ठेवले आहेत, अशी विचारणा केली. मात्र, केला यांनी घरात पैसे नसल्याचे सांगितले. तेव्हा त्याने त्यांना चेकबूक शोधायला लावले. त्यांच्या तीन कोऱ्या चेकवर सह्या घेतल्या. हिरेजडीत अंगठ्या आणि चेक घेऊन तो लिफ्टने फरार झाला. भरदुपारी ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली. केला यांनी याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जात पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनी विविध वस्तूंवरचे ठसे घेतले. याप्रकरणी पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. लवकरात लवकर आरोपीला बेड्या ठोकण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

माहितीगाराचा सहभाग?

केला यांच्या घरात तरुण बळजबरीने घुसला. त्याने त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवला. तेव्हा केला यांनी मोलकरणीला आरडाओरडा करायला सांगितला. मात्र, ती गप्प राहिली. शिवाय केला यांच्या घरात आणि परिसरात सीसीटीव्ही लावलेले आहेत. मात्र, घटनेवेळी घरातील सीसीटीव्ही बंद केलेले पोलिसांना आढळले आहेत. या लुटप्रकरणी घरातील व्यक्तीचा सहभाग असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीनेही त्यांनी तपास सुरू केला आहे. मात्र, घटडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे.

इतर बातम्याः

Nashik | राष्ट्रीय लोकअदालतीत 28 हजार 165 प्रकरणांचा निपटारा; 60 लाख 35 हजारांचा दंड वसूल

Nashik| नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण; दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.