VIDEO : सोन्याच्या बिस्किटांचे आमिष देवून महिलेच्या अंगावरील दागिने पळवले, घटना सीसीटीव्हीत कैद
लातूरमध्ये तर विचित्रच घटना समोर आली आहे. काही भामट्यांनी एका महिलेला सोन्याचे बिस्किटे देतो, असं आमिष देवून त्या महिलेच्या अंगावरील दागिने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.
लातूर : सोन्यासाठी लोक काय करतील याचा काहीच भरोसा नाही. लातूरमध्ये तर विचित्रच घटना समोर आली आहे. काही भामट्यांनी एका महिलेला सोन्याचे बिस्किटे देतो, असं आमिष देवून त्या महिलेच्या अंगावरील दागिने पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे आरोपींनी महिलेकडून सोन्याच्या बिस्किटांचे आमिष देण्याचे नाव करुन अंगावरील दागिनेदेखील काढायला लावले. महिला आरोपींच्या बोलण्यात अडकली. त्यानंतर आरोपी महिलेची फसवणूक करुन पळून गेले. पण त्यांच्या या सर्व कृत्यावर डोळा ठेवणाऱ्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे.
नेमकं प्रकरण काय?
लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका महिलेला सोन्याच्या बिस्किटांचं आमिष दाखवून तिच्या अंगावरची सोन्याची दागिने पळवल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. उदगीर शहरातल्या बाजारपेठेत आलेल्या या महिलेला दोघा जणांनी आपल्याकडे सोन्याची बिस्किटे आहेत आणि ती तुम्ही घ्या. तुच्याकडचे दागिने आम्हाला द्या, अशी बतावणी करुन फसवले आहे.
पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु
संबंधित प्रकार हा सीसीटीव्हीत अचूकपणे कैद झाला आहे. आपल्या कौटुंबिक अडचणींमुळे आपण हे सोन्याची बिस्किटे तुम्हाला देत असल्याची बतावणी करताना चोरटे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत. आरोपींनी धूम ठोकल्यानंतर महिलेला जाग आली. ती आरोपींना शोधू लागली. त्यानंतर परिसरातील नागरिकांनी महिलेची विचारपूस केली. यावेळी महिलेने टाहो फोडला. अखेर पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यामध्ये आरोपी कशाप्रकारे महिलेला फसवतात ते स्पष्टपणे दिसत आहे. पोलीस आता या प्रकरणाची तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.
घटनेचा व्हिडीओ बघा :
लातूरच्या उदगीरमध्ये सोन्याचे बिस्किटे देतो सांगून महिलेचे दागिने लुबाडले pic.twitter.com/n5Az5SpvMw
— CHETAN PATIL (@chetanpatil1313) August 19, 2021
सोलापुरात ज्वेलरकडे खरेदीला आलेल्या ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी
लातूरसह सोलापुरात देखील दागिने चोरीची घटना समोर आली आहे. सोलापूर शहरातील लकी चौकात असलेल्या गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात खरेदीसाठी आलेल्या महिला ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी झाली. बुधवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास झालेली चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. यावेळी तीन महिला चोरांच्या सोबत एक लहान मुलगाही दिसत आहे.
सोलापूर शहरातील विजापूर रोडवरील राजस्व नगरातील प्रभावती ज्ञानोबा शिरगिरे या आपल्या पाटल्या बदलून घेण्यासाठी लकी चौकातील गणेश रामचंद्र आपटे या सराफ दुकानात गेल्या होत्या. पाटल्या त्यांनी बॅगेत ठेवल्या होत्या, मात्र त्या दुकानात राखी पाहत असताना त्याच वेळेस त्यांच्या बॅगेतून या पाटल्या महिला चोरांनी चोरल्या. त्यानंतर महिला पसार झाल्या आहेत.
हेही वाचा :
ज्वेलरकडे खरेदीला आलेल्या ग्राहकाच्या पाटल्यांची चोरी, तीन महिला चोरांसोबत लहान मुलगाही