आधी रेमडेसिवीरचे पैसे घ्यायचे, नंतर पोलिसांचा धाक, भामट्यांपासून सावध राहा !

रायगड जिल्ह्यातील तीन मित्रांना झटपट पैसे कमावण्याचा नवीन फंडा चांगलाच महागात पडला आहे (Panvel Police arrest three friends who black marketing Remdesivir).

आधी रेमडेसिवीरचे पैसे घ्यायचे, नंतर पोलिसांचा धाक, भामट्यांपासून सावध राहा !
आधी रेमडेसिवीरचे पैसे घ्यायचे, नंतर पोलिसांचा धाक दाखवायचे, भामट्यांपासून सावध राहा !
Follow us
| Updated on: Apr 29, 2021 | 2:50 PM

नवी मुंबई : रायगड जिल्ह्यातील तीन मित्रांना झटपट पैसे कमावण्याचा नवीन फंडा चांगलाच महागात पडला आहे. सध्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि पोलिसांची सुरु असलेली कारवाई लक्षात घेऊन या तिघांनी भयानक योजना आखली. ते पैसे कमवण्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि गुन्हा लपवण्यासाठी पोलिसांच्या नावाचा वापर करायचे. या माध्यमातून त्यांनी अनेकांना लुबाडलं. पण अखेर ते पोलिसांच्या तावडीत सापडलेच. पोलिसांनी आता तिघांना बेड्या ठोकल्या आहेत Panvel (Police arrest three friends who black marketing Remdesivir).

आरोपी रुग्णांना कसे लुटायचे?

आरोपी रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर इंजेक्शन घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी बोलवायचे, त्यांच्याकडून पैसे घेऊन इंजेक्शन आणून देतो सांगायचे. नंतर ते तिथून पळ काढायचे. शिवाय आपला मोबाईल बिनधास्तपणे सुरु ठेवायचे. पैसे दिलेल्या व्यक्तीचा फोन आला की, आपल्या सहकाऱ्याला पोलिसांनी पकडलं, त्यात सगळे इंजेक्शन जप्त झाले, असं सांगून कारवाईची भीती दाखवायची, असा फंडा या चोरट्यांचा होता.

पोलिसांनी आरोपींना कसं पकडलं?

या त्रिकुटाच्या गुन्ह्याची खबर पनवेल पोलिसांना लागली. त्यांनी या आरोपींना पकडण्यासाठी शिस्तबद्ध नियोजन केलं, पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय लांडगे यांनी पथक तयार केलं. त्याआधारे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे गुन्ह्यातील तीन पैकी एका आरोपीस पनवेलच्या सुकापूर येथून अटक केली. तर दोन आरोपींना माणगाव येथून अटक करण्यात आली.

आरोपींकडून 83 हजारांचा मुद्देमाल जप्त

आकाश म्हात्रे, सौरभव बोनकर आणि अनिकेत तांडेल असे या तीन आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून 83 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिसांनी साफळा रचून त्यांचं पितळ उघड पाडलं आणि तिघांना अटक केली. पोलिसांच्या या कामगिरीचं शहरात कौतुक केलं जात आहे.

पोलिसांचं नागरिकांना आवाहन

“कोरोना संकाट काळत वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा शासकीय यंत्रणेच्या देखरेखीखाली होत आहे. कोणीही अशाप्रकारे खाजगी इसमांना रेमडेसिवीरसाठी पैसे देऊन स्वत:ची फसवणूक करुन घेवू नका”, असे अवाहन नवी मुंबई पोलिसांनी केले आहे (Panvel Police arrest three friends who black marketing Remdesivir).

हेही वाचा : जेलमधून सुटला, टीव्हीवर रेमडेसिवीरचा तुटवड्याची बातमी बघितली, 12 मेडिकलमध्ये इंजेक्शनची चोरी, पोलिसांकडून बेड्या

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.