Jawan Firing | सुट्टी नाकारल्याचा राग, जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 38 वर्षीय आरोपी सुकांता दास टीएसआरच्या 5 व्या बटालियनमध्ये कार्यरत होता. त्याने सुभेदार मार्का सिंग जमातिया आणि नायब सुभेदार किरण जमातिया या त्याच्या वरिष्ठांची हत्या केली.

Jawan Firing | सुट्टी नाकारल्याचा राग, जवानाचा वरिष्ठांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू
फरार आरोपी नगरसेवक संजय तेलनाडे अडीच वर्षांनी गजाआड
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 10:57 AM

आगरतळा : त्रिपुरा राज्य रायफल्स (टीएसआर) (Tripura State Rifles (TSR) विभागाच्या दोन कर्मचार्‍यांची त्यांच्याच सहकाऱ्याने गोळ्या घालून हत्या केली. सेपाहिजाला जिल्ह्यातील कोनाबोन भागातील एका सैन्य छावणीत शनिवारी ही घटना घडली. सुट्टी नाकारल्याच्या रागातून आरोपी जवानाने हा हल्ला केल्याचा आरोप आहे. आरोपीने आत्मसमर्पण केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

काय आहे प्रकरण?

पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, 38 वर्षीय आरोपी सुकांता दास टीएसआरच्या 5 व्या बटालियनमध्ये कार्यरत होता. त्याने सुभेदार मार्का सिंग जमातिया आणि नायब सुभेदार किरण जमातिया या त्याच्या वरिष्ठांची हत्या केली. कारण त्यांनी सुकांताच्या सुट्ट्या मंजूर केल्या नव्हत्या. 2002 पासून तो टीएसआरच्या सेवेत होता.

बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज ऐकून बटालियनच्या इतर सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी त्यांना सुभेदार आणि नायब सुभेदार रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु सुभेदारांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले, तर नायब सुभेदाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आरोपीचे आत्मसमर्पण

सुकांता दासने आमच्यासमोर आत्मसमर्पण केल्यानंतर आम्ही त्याला अटक केली. त्याच्यावर खून आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक चौकशी आणि इतर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर रविवारी त्याला न्यायालयात हजर केले जाण्याची शक्यता आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी दोन्ही मृत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

संबंधित बातम्या :

Nagpur Crime प्रेमीयुगुलाची गळफास लावून आत्महत्या, भंडारा जिल्ह्यातील परसोडीतील घटना

Molestation | स्नॅपचॅटवर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अहमदनगरात आरोपीला बेड्या

Kanpur Triple Murder | ओमिक्रॉन सर्वांचा जीव घेईल, डॉक्टर नवऱ्याकडून पत्नी आणि दोन मुलांची हत्या

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....