Jharkhand Crime : ये दोस्ती हम नही छोडेंगे… सोबतच गुणगुणायचे, आयुष्यही एकत्रच संपवलं; जगावेगळ्या मैत्रीचा असा झाला करूण अंत

दोन्ही तरुणांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. रामजन्मा हा अपंग असल्याने ट्रायसायकलवर चालत असे. तर त्याचा मित्र सुद्दू त्याची सायकल ढकलत असे. हे दोघेही शोले चित्रपटातील 'ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर...' हे गाणे गुणगुणत असायचे. आपण एकत्र जगू आणि सोबतच मरू, ही गोष्ट या दोघांनी अनेकवेळा गावातील लोकांसमोर बोलून दाखवली होती.

Jharkhand Crime : ये दोस्ती हम नही छोडेंगे... सोबतच गुणगुणायचे, आयुष्यही एकत्रच संपवलं; जगावेगळ्या मैत्रीचा असा झाला करूण अंत
जगावेगळ्या मैत्रीचा करूण अंत
Follow us
| Updated on: Jan 26, 2022 | 9:02 PM

झारखंड : ये दोस्ती हम नही छोडेंगे म्हणत एका जगावेगळ्या मैत्रीचा करुण अंत झाल्याची दुर्दैवी घटना झारखंड(Jharkhand)मधील पालूममध्ये घडली आहे. एका मित्राची प्रेमात फसवणूक झाल्याने ‘शोले’ चित्रपटातील जय-वीरूसारखे मित्र असलेल्या दोन तरुणांनी एकत्र आत्महत्या(Suicide) केली आहे. सुद्दू भुयान आणि रामजन्मा अशी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. रामजन्मा हा तरुण अपंग होता. दोघांनीही झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. याप्रकरणी नोदिहा बाजार पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. (Two friends commit suicide over love affair in Jharkhand)

मित्राला प्रेमात धोका मिळाल्याने दोघांनीही जीवनयात्रा संपवली

सुद्दू भुयान या तरुणाचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये कोणत्या तरी कारणावरुन वाद झाले. यानंतर त्या मुलीने सुद्दुसोबत प्रेमसंबंध तोडले. यामुळे सुद्दू मानसिक तणावात होता. सुद्दूने ही गोष्ट आपला जीवलग मित्र रामजन्मा यास सांगितली. तसेच आपल्या आत जगण्याची इच्छा नसून आपण आत्महत्या करणार असेही सुद्दूने सांगितले. हे ऐकल्यानंतर रामजन्मानेही मित्राच्या या निर्णयात साथ देऊन सोबत मरण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर दोन्ही तरुणांनी झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. याआधीही सुद्दूने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, मात्र तो अयशस्वी ठरला होता, एसएचओ रंजीत कुमार यांनी सांगितले. छतरपूरचे इन्स्पेक्टर वीर सिंग मुंडा यांनी सांगितले की, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

नेहमी गुणगुणायचे शोलेचे गाणे

दोन्ही तरुणांमध्ये खूप घट्ट मैत्री होती. रामजन्मा हा अपंग असल्याने ट्रायसायकलवर चालत असे. तर त्याचा मित्र सुद्दू त्याची सायकल ढकलत असे. हे दोघेही शोले चित्रपटातील ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे, तोडेंगे दम मगर…’ हे गाणे गुणगुणत असायचे. आपण एकत्र जगू आणि सोबतच मरू, ही गोष्ट या दोघांनी अनेकवेळा गावातील लोकांसमोर बोलून दाखवली होती. अखेर त्यांनी त्याचे म्हणणे खरे ठरवले, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे. (Two friends commit suicide over love affair in Jharkhand)

इतर बातम्या

Delhi Crime : आजारी आईसाठी मदत मागायला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याकडून बलात्कार

Google CEO Sundar Pichai: कालच पद्मभूषण मिळालेले गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्याविरोधात एफआयआर दाखल; नेमकं प्रकरण काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.