धाराशिव जिल्ह्यात 4 वर्षाच्या दोन चिमुकलींसोबत मन हेलावणारं कृत्य, अतिशय संतापजन प्रकार

राज्यात महिला आणि मुली किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्यात अवघ्या चार वर्षाच्या मुलीदेखील सुरक्षित आहेत की नाही? असा प्रश्न निर्माण झालाय. कारण तशा धक्कादायक घटना आता समोर येताना दिसत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात 4 वर्षाच्या दोन चिमुकलींसोबत मन हेलावणारं कृत्य, अतिशय संतापजन प्रकार
Follow us
| Updated on: Aug 26, 2023 | 11:22 PM

धाराशिव | 26 ऑगस्ट 2023 : राज्यात महिला आणि मुलींवरील अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होताना दिसत नाहीयत. काही दिवसांपूर्वी जळगाव जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं होतं. संबंधित घटना ताजी असताना जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात आणखी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समोर आली होती. राज्यात वारंवार अशा घटना समोर येत आहेत. आरोपींवर काठोरात कठोर कारवाई मागणी केली जात आहे. असं असताना आता धाराशिव जिल्ह्यातूनही अशीच एक घटना समोर आली आहे.

लहान मुलींवरील बलात्काराच्या 2 घटनांनी धाराशिव जिल्हा हादरला आहे. 4 वर्षाच्या लहान मुलीवर 68 वर्षीय नराधमाने पाशवी बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. गणपती गपाट असे आरोपीचे नाव आहे. संबंधित घटना ही वाशी तालुक्यातील इंदापूर येथील आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. आरोपीने अल्पवयीन चिमुकली खेळायला घरी आली तेव्हा घरात कोणी नसताना बलात्कार केला. त्यानंतर आरोपी फरार झाला. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

धाराशिव जिल्ह्यात अशीच एक अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची दुसरी घटनादेखील घडली आहे. दुसऱ्या घटनेत 4 वर्षाच्या मुलीवर 15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाने घरात आलेल्या शेजारच्या मुलीवर बलात्कार केला. या प्रकरणाती आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित घटना ही कळंब शहारातील असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालीय.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.