पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच धारदार शस्त्राने हल्ला, बीडमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर

जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. काल (9 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांवर सात ते आठ जणांनी अचानकपणे हल्ला केल्याची घटना घडली. हल्लेखोरांच्या हातात धारदार शस्त्रे होती.

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच धारदार शस्त्राने हल्ला, बीडमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
BEED CRIME
Follow us
| Updated on: Oct 10, 2021 | 7:08 PM

बीड : जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी होण्याचे नाव घेत नाहीये. काल (9 ऑक्टोबर) मध्यरात्रीच्या सुमारास दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांवर सात ते आठ जणांनी अचानकपणे हल्ला केल्याची घटना घडली. हल्लेखोरांच्या हातात धारदार शस्त्रे होती. ऐन पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच हा हल्ला करण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच तरुणांवर हल्ला

बीडमध्ये 9 ऑक्टोबर रोजी एक थरारक घटना घडली. दुचाकीवरून जाणाऱ्या दोन तरुणांवर तब्बल सात ते आठ अज्ञात लोकांनी अचानकपणे हल्ला केला. या हल्ल्यात दोन्ही तरुण जखमी झाले. विशेष म्हणजे हा हल्ला थेट पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरच करण्यात आला. हल्ला झाल्यानंतर जीव वाचविण्यासाठी जखमी तरुण विव्हळत होते. मात्र त्यांना कसलीच मदत मिळाली नाही.

कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

सध्या या तरुणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आठ जणांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांच्या कार्यालयासमोरच हा हल्ला झाल्यामुळे बीडमधील कायदा व सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मुलानेच केली होती आईची हत्या

तर दुसरीकडे अशीच एक घटना ऑगस्ट महिन्यात बीडच्या चौसाळा गावात घडली होती. पांडुरंग मानगिरे नावाच्या मुलाने आपल्या आईची हत्या केली होती. त्याने घरी आल्यानंतर त्याची आई प्रयागाबाई मानगिरे यांच्यासोबत वाद घातला होता. यावेळी त्याने आईला अमानुष मारहाण केली होती. याच मारहाणीत आईचा दुर्देवी मृत्यू झाला होता. त्यानंतर तो घरातून पळून गेला होता. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचानामा करत मुलाचा शोध सुरु केला होता. पोलिसांना तो जालना जिल्ह्याच्या सीमेवर सापडला होता.

जळगावमध्ये मुलगा, वडिलावर गोळीबार 

जळगावमध्ये नशिराबाद हत्येची घटना घडली होती. भुसावळ तालुक्यातील नशिराबाद खुनाच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या एका संशयित आरोपीची अज्ञात मारेकऱ्यांनी सप्टेंबर महिन्यात निर्घृणपणे हत्या केली होती. धम्मप्रिय मनोहर सुरळकर (वय 19) असे या घटनेतील मृत तरुणाचे नाव होते.धम्मप्रिय आणित त्याचे वडील मनोहर सुरळकर हे भुसावळ शहरातील पंचशील नगरातील रहिवासी आहेत. ते 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी जळगावातून दुचाकीने भुसावळला घरी जात होते. मात्र, मारेकऱ्यांनी त्यांच्यावर अचानकपणे सशस्त्र हल्ला केला होता. त्यात धम्मप्रियचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याचे वडील गंभीर जखमी झाले होते.

इतर बातम्या :

दहशत! तपासणी केली तर 85 कैदी HIV पॉझिटिव्ह, नेमकं कारण काय?

पोलिसांना शिवीगाळ, काँग्रेसच्या दोन महिला कार्यकर्तींना एक दिवसाची पोलीस कोठडी

पत्नी आणि सासूवर गोळ्या झाडल्या, नंतर थेट पोलिसांना कॉल, म्हणाला….

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.