Video : भररस्त्यात सुरु होतं भांडण, होंडा सिटी भरधाव वेगाने आली, तिनं केलं तांडव!
UP Crime News Viral Video : बीबीए आणि बीसीए कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा झाला. सीनिअर, ज्युनिअर असल्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं.
उत्तर प्रदेशच्या (Up Crime News) गाझियाबादमधला एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (Viral Video) झालाय. रस्त्यावर काही तरुण भांडतायत, असं व्हिडीओमध्ये दिसून आलंय. काही विद्यार्थी घोळक्याने उभे असतात. त्यानंतर त्यातील काही विद्यार्थी एकमेकांचे गळे पकडतात. इतक्यात पांढऱ्या रंगाची एक होंडा सिटी कार येते. ती भरधाव वेग पकडते. रस्त्यावरची मुलं बाजूला होतात. पण त्यातही दोन मुलांना ही भरधाव होंडा सिटी जोरदार धडक देते.
होंडा सिटी कारची धडक इतकी भीषण असते की, मुलं थेट गाडीच्या काचेवरच आदळतात आणि रस्त्यावर कोसळतात. त्यानंतर होंडा सिटीचा (Honda City) वेग कमी होतो. गाडी बाजूला जाऊन थांबते. पण नंतर पुन्हा एक विचित्र गोष्ट व्हिडीओत पुढे दिसून आली आहे.
गाडीने धडक दिल्यानंतर रस्त्यावर कोसळलेले दोघेही जण रस्त्यावरुन उठून उभे राहतात आणि पुन्हा एकमेकांसोबत मारमारी करु लागतात. यात कारच्या काचेचं आणि बोनेटचंही नुकसान होतं. पण काही तरुण अपघातानंतरही वाद घाण्यातच दंग असल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसून आलंय.
मसुरीमधील ही घटना असून तिथल्याच स्थानिक कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी एकमेकांमध्ये भिडले होते, अशी माहिती समोर आलीय. बीबीए आणि बीसीए कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार राडा झाला. सीनिअर, ज्युनिअर असल्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर बाचाबाचीचं रुपांतर हाणामारीत झालं.
पाहा व्हिडीओ :
सड़क के बीचो बीच दो छात्र गुटों के बीच जबरदस्त लड़ाई हुई. इसके बाद एक सफेद रंग की कार तेजी से आकर दो लड़ रहे दो छात्रों को टक्कर मार देती है और छात्र हवा में उछल जाते हैं.
वायरल वीडियो गाजियाबाद के मसूरी का है. pic.twitter.com/CfNspUlD9I
— Kumar Abhishek (@active_abhi) September 22, 2022
या व्हायरल व्हिडीओची पोलिसांकडून गंभीर दखल घेण्यात आलीय. पोलिसांनी याप्रकरणी रस्त्यावरच राडा करणाऱ्या मुलांवर कारवाईला सुरुवात केली आहे. अधिक तपास केला जातोय. तसंच ज्या गाडीने मुलांना चिरडलं, ती होंडा सिटी कारही पोलिसांनी ताब्यात घेतलीय.
ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची कसून चौकशी पोलीस करत आहेत. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हटलंय. या संपूर्ण प्रकरणाचा थराराक व्हिडीओही समोर आलाय. हाणामारी आणि कार युवकांना चिरडतानाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतलीय.