महिला बँक अधिकारी आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट, डायरीमध्ये लग्न मोडलेल्या तरुणाचं नाव

अयोध्या पोलिसांसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या प्रादेशिक कार्यालयातील स्केल 1 अधिकारी श्रद्धा गुप्ता यांचे आत्महत्या प्रकरण एक गूढ होत चालले आहे. श्रद्धा गुप्ता यांचे विवेक गुप्तासोबत ठरलेले लग्न मोडले होते.

महिला बँक अधिकारी आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट, डायरीमध्ये लग्न मोडलेल्या तरुणाचं नाव
Shraddha Das
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 2:10 PM

लखनौ : उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील महिला बँक अधिकारी श्रद्धा दास यांच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांच्या हाती अद्यापही कुठलेच धागेदोरे लागलेले नाहीत. मुख्य संशयित आरोपी विवेक गुप्ताची पोलीस गेल्या 24 तासांपासून चौकशी करत असतानाच दुसरीकडे आयपीएस अधिकारी आशिष तिवारीही या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचा जबाब पोलीस अधिकाऱ्यांना देत आहेत. सध्या पोलीस मयत महिलेचे कॉल डिटेल्सही तपासत असून, त्यामुळे आत्महत्येस प्रवृत्त करण्यामागे कोणाचा हात आहे, हे शोधण्यास मदत होण्याची अपेक्षा आहे.

काय आहे प्रकरण?

अयोध्या पोलिसांसाठी पंजाब नॅशनल बँकेच्या प्रादेशिक कार्यालयातील स्केल 1 अधिकारी श्रद्धा गुप्ता यांचे आत्महत्या प्रकरण एक गूढ होत चालले आहे. श्रद्धा गुप्ता यांचे विवेक गुप्तासोबत ठरलेले लग्न मोडले होते. त्यामुळे गुप्ता त्यांना त्रास देत होता का, हे पोलिसांना समजलेलं नाही. तसेच दीड वर्षांपूर्वी अयोध्येचे एसएसपी राहिलेले आयपीएस अधिकारी आशिष तिवारी यांचा या प्रकरणाशी काय संबंध आहे, हेही पोलीस तपासत आहेत.

IPS अधिकारी आशिष तिवारींचे नाव

शनिवारी रात्रीच पोलिसांनी विवेक गुप्ता याला लखनौ येथून ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. 24 तासांहून अधिक काळ लोटला असून, विवेक गुप्ताची चौकशी सुरू आहे. या संपूर्ण आत्महत्या प्रकरणात चर्चेत आलेले सर्वात मोठे नाव म्हणजे IPS अधिकारी आशिष तिवारी. दीड वर्षांपूर्वी अयोध्येचे एसएसपी असलेले आयपीएस अधिकारी आशिष तिवारी सध्या लखनऊच्या विशेष सुरक्षा दलाचे म्हणजेच एसएसएफचे एसपी आहेत. श्रद्धा गुप्ता यांनी सुसाईड नोटमध्ये आशिष तिवारीच्या नावासमोर एसएसएफ हेड लखनऊ लिहिले आहे.

श्रद्धाच्या डायरीमध्ये विवेकविषयी पोलखोल

पोलिसांनी श्रद्धाच्या खोलीतून दोन डायरीही जप्त केल्या आहेत, ज्यात तिने विवेकसोबत संबंध कसे बिघडले, त्याने इतर मुलींसोबत असलेले आपले संबंध कसे लपवले, तो कसा खोटं बोलत राहिला, अशा गोष्टी तिने क्रमाक्रमाने लिहिल्या आहेत. इतकेच नाही तर डायरीच्या एका पानावर श्रद्धाने विवेक गुप्ता यांची चौकशी केल्यास सर्व सत्य बाहेर येईल, असे स्पष्टपणे लिहिले आहे. त्यामुळे श्रद्धाच्या मृत्यू प्रकरणाचे गूढ लवकरच उकलण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या :

आयफोन ठरला हत्येचं कारण, मृतदेह शेतात फेकला, पोलिसांनी कसा शोधला?

‘बाळांनो, व्हिडीओ ऑन करा’ विद्यार्थ्यांना डोळे भरुन पाहिलं, ऑनलाईन लेक्चर संपताच शिक्षिकेचा अंत

CCTV VIDEO | खड्ड्यात आदळून दुचाकी घसरली, बसखाली चिरडून 32 वर्षीय इंजिनिअरचा मृत्यू

Non Stop LIVE Update
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी
धारावीची जमीन अदानीला देण्यासाठी महाराष्ट्र सरकार पाडले - राहुल गांधी.
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल
१५०० देत आहेत पण तुमच्याकडून घेत किती आहेत?, प्रियंका गांधी यांचा सवाल.
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप
नरेंद्र मोदी जातीय जनगणनेविरोधात, राहुल गांधी यांचा आरोप.
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.