Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Blue Drum Case : निळ्या ड्रमची दहशत, एक मर्डर अन् लोकांचा ड्रमवरच अघोषित बहिष्कार; काय घडलं?

उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांडानंतर मेरठमध्ये निळ्या ड्रमची विक्री पूर्णपणे ठप्प झाली आहे. मुस्कान आणि साहिल यांनी सौरभचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये टाकला होता, या घटनेनंतर लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. ड्रम विक्रेते या घटनेमुळे मोठ्या आर्थिक नुकसानीचा सामना करत आहेत आणि त्यांच्या व्यवसायावर संकट आले आहे. सोशल मीडियावर या घटनेवर विनोदी पोस्ट्स देखील व्हायरल होत आहेत.

Blue Drum Case : निळ्या ड्रमची दहशत, एक मर्डर अन् लोकांचा ड्रमवरच अघोषित बहिष्कार; काय घडलं?
एक मर्डर अन् लोकांचा ड्रमवरच अघोषित बहिष्कारImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 25, 2025 | 1:52 PM

उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरून गेला आहे. या प्रकरणी सौरभची बायको मुस्कान आणि तिचा बॉयफ्रेंड साहिल यांना अटक करण्यात आली आहे. साहिलची हत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह एका निळ्या ड्रममध्ये टाकला आणि वरून सिमेंट लावून तो ड्रम बंद करण्यात आला होता. नंतर हा ड्रम कापून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. पण मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी निळ्या ड्रमचा वापर करण्यात आल्याची बातमी देशभर पसरली आहे. मेरठमध्ये तर या निळ्या ड्रमची एवढी दहशत निर्माण झालीय की लोकांनी ड्रम खरेदी करणच बंद केलं आहे. त्यामुळे ड्रम विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.

मुस्कान आणि साहिलने हा निळा ड्रम मेरठच्या जली कोठी परिसरातून खरेदी केला होता. हे निळ्या ड्रमचं मार्केट आहे. पण हत्येची बातमी आल्यापासून ड्रमची विक्री थांबली आहे. त्यामुळे विक्रेते प्रचंड नाराज आहेत. लोकं आता आमच्याकडे येत नाहीत. आले तरी निळा ड्रम घेत नाहीत, असं व्यापारी सांगतात. मेरठच्या घंटाघर परिसरात निळे ड्रम विकण्याची जेवढी दुकाने आहेत, सध्या त्या ठिकाणी स्मशान शांतता पसरली आहे.

आयडी पाहूनच ड्रम विकणार

दुकानदार रिकामेच बसलेले दिसत आहेत. एवढंच कशाला ग्राहकांना समजावण्याचा प्रयत्नही दुकानदार करत आहेत. ज्यांनी गुन्हा केला ते तुरुंगात आहेत. ड्रमचा काय दोष आहे? असा सवाल दुकानदार ग्राहकांना करत आहेत. काही दुकानदार तर ग्राहकांकडे जाऊन ड्रमची खासियतही सांगत आहेत. पाण्यासाठी ड्रम किती उपयोगी आहे याची माहिती देत आहेत. धान्य ठेवण्यासाठी त्याचा कसा वापर करता येऊ शकतो याचीही माहिती देत आहेत. मात्र, तरीही ग्राहक ऐकायला तयार नाहीत. आता आम्ही आयडी पाहूनच ड्रम विकणार आहोत, असं ड्रम विक्रेत्यांनी सांगितलं. सौरभ मर्डर केसचं सर्वात जास्त नुकसान ड्रम विक्रेत्यांना झालं असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.

हे सुद्धा वाचा

सोशल मीडियातून जोक व्हायरल

सौरभ हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला. मुस्कान आणि साहिलने सौरवची हत्या केली. त्याचे डोकं धडापासून वेगळं करून त्याचे मनगट कापले आणि निळ्या ड्रममध्ये ठेवण्यात आले. डोकं वेगळं ठेवण्यात आले, धड वेगळं ठेवण्यात आले, चाकू वेगळा ठेवला होता आणि मनगटं वेगळी ठेवली होती. या हत्याकांडात निळ्या ड्रमचा उल्लेख होता. त्यामुळे त्यावरून सोशल मीडियावर आता जोक्सही व्हारल होत आहेत. “भाई, निळा ड्रम घरी न्या, किंवा फुकट घ्या,” असे जोक्स सोशल मीडियातून व्हायरल होत आहेत. त्वरित निळा ड्रम बायको आणते आणि पती त्यापासून दूर पळत जातो, असंही काही व्हिडीओतून दाखवण्यात आलं आहे. खरंतर, अशा घटना दुकानदारांसाठी किती मोठं संकट ठरू शकतात, याचंच हे उदाहरण आहे.

हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.