नातेवाईकासोबत प्रेम प्रकरणाचा राग, भावाकडून बहिणीची गळा दाबून हत्या

मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी नातेवाईकांनी अल्पवयीन तरुणीचे पार्थिव लपून छपून दफन करण्याची तयारी सुरु केली.

नातेवाईकासोबत प्रेम प्रकरणाचा राग, भावाकडून बहिणीची गळा दाबून हत्या
भावाकडून बहिणीची गळा दाबून हत्या
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 2:26 PM

लखनौ : बहिणीच्या प्रेम प्रकरणामुळे नाराज असलेल्या भावाने तिची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बेदम मारहाण करुन गळा दाबून भावाने बहिणीचा जीव घेतला. उत्तर प्रदेशातील बिजनौरमध्ये ही घटना घडली आहे. मुलीच्या नातेवाईकांनी पोलिसांना याविषयी माहिती देण्याऐवजी गुपचूप तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी केली होती, मात्र पोलिसांनी आरोपी भावाला बेड्या ठोकल्या असून तरुणीचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. (Uttar Pradesh Crime News Brother killed Sister for having affair with relative)

अल्पवयीन तरुणीवर कुटुंबाचा दबाव

उत्तर प्रदेशातील बिजनौर शहरातील नगीना भागात हा प्रकार घडला. संबंधित तरुणी अल्पवयीन होती. तिचे एका नातेवाईकासोबत काही काळापासून प्रेमसंबंध सुरु होते. याची कुणकुण लागल्यामुळे तिचे कुटुंबीय आणि विशेष म्हणजे तिचा भाऊ अत्यंत नाराज होता. हे नातेसंबंध तोडण्याविषयी भाऊ आणि कुटुंबीयांनी तिच्यावर अनेकदा दबाव आणला. परंतु ती कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती.

मारहाण करुन गळा आवळला

दोन दिवसांपूर्वी बहीण-भावात या कारणावरुन पुन्हा एकदा वाद झाला. त्यानंतर चिडलेल्या भावाने तिला बेदम मारहाण केली. त्यानंतर गळा दाबून तिची निर्घृण हत्या केली. यामुळे कुटुंबात एकच खळबळ उडाली. अखेर मुलाचा गुन्हा लपवण्यासाठी नातेवाईकांनी तिचे पार्थिव लपून छपून दफन करण्याची तयारी सुरु केली.

गुपचूप अंत्यसंस्काराची तयारी

नातेवाईकांनी सकाळीच कबरस्तानाच कबर खोदण्यास सुरुवात केली, मात्र इतक्यात पोलिसांना या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन युवतीचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पंचनामा करुन पोस्टमार्टमसाठी पाठवला. आरोपी भाऊ सारिकला अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नाईलाजाने हत्या, भावाची कबुली

माझ्या बहिणीचे नातेवाईकासोबत प्रेम प्रकरण सुरु होते. मी अनेकदा समजवूनही तिने ऐकलं नाही. त्यामुळे नाईलाजाने मला हे पाऊल उचलावं लागलं, अशी कबुली भावाने पोलिसांना दिली. पोलिसांनी आरोपी भावावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

संबंधित बातम्या :

नवविवाहित मुलीची आई-वडिलांकडून हत्या, कोरोनाने बळी गेल्याचा बनाव

धावत्या ट्रेनमध्ये प्रेयसीची चाकू भोसकून हत्या, सात दिवसात तुरुंगात प्रियकराची आत्महत्या

(Uttar Pradesh Crime News Brother killed Sister for having affair with relative)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.