परजातीच्या प्रियकरामुळे अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट, आईला संताप अनावर, मुलाच्या मदतीने लेकीचा जीव घेतला

महिलेने मुलाच्या मदतीने तिच्या मुलीचा गळा आवळून खून केला. मायलेकाने हे प्रकरण आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या शवविच्छेदन अहवालात खुनाचा उलगडा झाला.

परजातीच्या प्रियकरामुळे अल्पवयीन मुलगी प्रेग्नंट, आईला संताप अनावर, मुलाच्या मदतीने लेकीचा जीव घेतला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 08, 2022 | 9:44 AM

लखनौ : उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील चौबेपूर भागात एका महिलेने तिच्या अल्पवयीन गरोदर मुलीची हत्या केली. गावात राहणाऱ्या दुसऱ्या जातीतील पुरुषाशी असलेल्या संबंधातून आपली मुलगी गर्भवती राहिल्याचं समजल्याने महिलेचा संताप झाला. संबंधित महिलेच्या मुलानेही तिला या गुन्ह्यात मदत केल्याचा आरोप आहे. आई-मुलगा आणि मयत अल्पवयीन मुलीच्या प्रियकरालाही पोलिसांनी शुक्रवारी अटक केली.

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने मंगळवारी रात्री मुलाच्या मदतीने तिच्या मुलीचा गळा आवळून खून केला. मायलेकाने हे प्रकरण आत्महत्या असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीच्या शवविच्छेदन अहवालात खुनाचा उलगडा झाला. पोलिसांनी पुरेसे पुरावे गोळा केले आणि त्यानंतर महिला आणि तिच्या मुलाला अटक केली. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार अल्पवयीन पीडितेच्या प्रियकरालाही बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.

प्रतिष्ठेच्या खोट्या समजातून हत्या

“सुरुवातीला, मायलेकाने अल्पवयीन मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला आणि तिला दुसऱ्या जातीतील पुरुषाशी संबंध तोडण्यास सांगितले, परंतु मुलीने स्पष्टपणे नकार दिला. अलिकडेच, जेव्हा मुलीच्या आईला तिच्या गरोदरपणाबद्दल कळले, तेव्हा तिने समाजातील आपल्या ‘प्रतिष्ठेचे’ रक्षण करण्याच्या बेगडी समजातून तिला संपवण्याचा निर्णय घेतला” अशी माहिती पोलिस स्टेशनचे प्रभारी कृष्ण मोहन राय यांनी दिली.

आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. शुक्रवारी, मृत मुलीच्या प्रियकरासह अटक केलेल्या सर्व आरोपींना तुरुंगात पाठवल्याचेही पोलिसांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

लग्नाआधीच आक्रित! नदीत सेल्फी घेताना मुंबईकर महिला बुडाल्या; सासूचा मृत्यू, होणाऱ्या सूनबाई बेपत्ता

दोन वर्षांनी गूढ उकललं, बाईक प्रवासात मालकाची कर्मचाऱ्याकडूनच हत्या, मृतदेह दरीत टाकला

नकली दातांनी प्रायवेट पार्टसह शरीराचे चावे घ्यायचा, बायकोची पोलीस ठाण्यात धाव

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.