उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतराचे बीड कनेक्शन, परळीच्या तरुणाला अटक
मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला होता. आता धर्मांतर प्रकरणात थेट बीडचा रहिवासी असलेल्या इरफानचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे
संभाजी मुंडे, टीव्ही 9 मराठी, परळी : बेकायदेशीर धर्मांतर प्रकरण उत्तर प्रदेशात चांगलेच गाजत आहे. मात्र यूपीतील धर्मांतर प्रकरणाचे कनेक्शन आता बीडमध्ये असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. इरफान खान नावाच्या तरुणाला अवैध धर्मांतर प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश एटीएसने ताब्यात घेतले आहे. इरफान मूळ बीडमधील परळी तालुक्यातील रहिवासी आहे. (Uttar Pradesh Illegal Religion Conversion Beed Parali Man arrested by ATS)
आरोपी दिल्लीत बालकल्याण विभागामध्ये दुभाषा
इरफानचे प्राथमिक शिक्षण परळी तालुक्यातील सिरसाळा या त्याच्या मूळ गावी झाले आहे. इरफान गेल्या अनेक वर्षांपासून दिल्लीत स्थायिक आहे. तिथे तो बालकल्याण विभागामध्ये दुभाषा म्हणून काम करतो. काही महिन्यांपूर्वी अहमदाबाद येथील एका कार्यक्रमात इरफान खानला उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाबासकीची थाप मिळाली होती.
कुटुंबियांना धक्का
मूकबधिर विद्यार्थ्यांना आमिष दाखवून त्यांचे धर्मांतर केले जात असल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात उघडकीस आला होता. आता धर्मांतर प्रकरणात थेट इरफानचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे. अवैध धर्मांतरण प्रकरणांत इरफानचं नाव आल्यामुळे त्याच्या परिवाराला मोठा धक्का बसला आहे. इरफान असं करुच शकत नाही, अशी त्यांची भावना आहे. मात्र या प्रकरणात जाहीर प्रतिक्रिया देण्यास त्याच्या नातेवाईकांनी नकार दिला आहे.
पाहा व्हिडीओ :
दरम्यान, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सुमारे एक हजार जणांचं जबरदस्ती धर्मांतर करण्यात आल्याची धक्कादायक माहिती गेल्याच आठवड्यात उघड झाली होती. त्यामुळे उत्तर प्रदेशातील योगी सरकार खडबडून जागे झाले आहे. जबरदस्तीने होणारे धर्मांतर रोखण्यासाठी योगी सरकारने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. जबरदस्ती धर्मांतर करणाऱ्यांना रासुका (राष्ट्रीय सुरक्षा कायदा) अंतर्गत अटक करा आणि अशा लोकांची संपत्तीही जप्त करा, असे आदेश योगींनी दिले होते. विशेष म्हणजे धर्मांतराविरोधात यूपीत कठोर कायदा लागू असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हे निर्देश दिले आहेत.
संबंधित बातम्या :
जबरदस्ती धर्मांतर केल्यास रासुका लागणार, संपत्तीही जप्त होणार; योगी सरकार अॅक्शन मोडमध्ये
Love Jihad | जोडीदार निवडताना धर्म-लिंगाचे निर्बंध नाहीत, हायकोर्टाचा योगी सरकारला झटका
(Uttar Pradesh Illegal Religion Conversion Beed Parali Man arrested by ATS)