Uttar Pradesh : रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलेचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी केला गुन्हा दाखल!

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडित महिलेने म्हटले होते की, 1 जुलै रोजी रात्री पैलाणी पोलिस स्टेशन हद्दीतील एका व्यक्तीने गेटचे लॅच तोडून घरात प्रवेश केला. त्याने महिलेचा विनयभंग केला, तिचे कपडे फाडले. कान व नाकातील दागिने चोरले. आरोपी दारूच्या नशेत होता, असे सांगितले जात आहे. पीडित महिलेनेविरोध केला असता दारुड्याने लाथा-बुक्क्यांनी तिला मारले

Uttar Pradesh : रात्रीच्या वेळी घरात घुसून महिलेचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी केला गुन्हा दाखल!
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 1:01 PM

उत्तर प्रदेशातील बांदा येथे एक धक्कादायक (Shocking) घटना उघडकीस आलीयं. सरकारी शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या घरात घुसून एका व्यक्तीने या महिलेवर अत्याचार करत लुटमार केलीयं. इतकेच नाही तर यामहिलेचे कपडे देखील फाडण्यात आले आहेत. महिलेने (Women) याला विरोध केला असता तिला लाथा-बुक्क्यांनीही मारहाण करण्यात आली. यासोबतच महिलेचे दागिनेही चोरण्यात आले. महिलेने गोंधळ घालून ओरडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी महिलेचा जीव वाचवला. यावेळी या आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचे कळते आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी (Police) गुन्हा दाखल केला आहे.

महिलेचा विनयभंग करत चोरीही केली

पोलिसांत दिलेल्या तक्रारीत पीडित महिलेने म्हटले होते की, 1 जुलै रोजी रात्री पैलाणी पोलिस स्टेशन हद्दीतील एका व्यक्तीने गेटचे लॅच तोडून घरात प्रवेश केला. त्याने महिलेचा विनयभंग केला, तिचे कपडे फाडले. कान व नाकातील दागिने चोरले. आरोपी दारूच्या नशेत होता, असे सांगितले जात आहे. पीडित महिलेने विरोध केला असता दारुड्याने लाथा-बुक्क्यांनी तिला मारले. महिलेने आरडाओरड केल्यानंतर शेजारी धावले. यावेळी त्याव्यक्तीने जीवे मारण्याची धमकी देत ​​घटनास्थळावरून पळ काढला.

हे सुद्धा वाचा

मारहाण करत आरोपीने दिली जीवे मारण्याची धमकी

पीडित महिलाही सरकारी शाळेत काम करते. पीडित महिलेने गुन्हा दाखल करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. बांदा शहराचे डेप्युटी एसपी राकेश कुमार सिंह यांनी सांगितले की, शहरातील कोतवाली परिसरात एका महिलेने एका पुरुषावर घरात घुसून मारहाण आणि विनयभंग केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तपास करून संबंधित व्यक्तीवर कारवाई केली जाणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.