Video | पोलीस चोरामागे धावला, लोकांना वाटलं पिक्चरचं शूटिंग आहे! पण तसं नव्हतं, पाहा थरारक घटना
Viral Video : मंगळुरुतल्या नेहरु मैदान परिसरात तिघांना मोबाईल चोरला. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वरुन अल्वा यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवल चोरांचा पाठलाग केला. चोर-पोलीस पकडापकडी सुरु झाली.
मंगळुरु : पोलीस चोरामागे धावतो. भर ट्रॅफिकमध्ये चोराला आडवा पाडतो आणि तुडवतो, असे सीन दहापैकी चार सिनेमात हमखास सापडतील. तशीच एक घटना समोर आली आहे. सुरुवातीला पोलीस चोरामागे धावतोय, म्हणजे एखाद्या सिनेमाचं शूटिंग सुरु असल्याचा भास लोकांना झाला. चोराला आडवा पाडल्यानंतरही लोकं दबकत दबकत पुढे आली. त्यानंतर त्यांनी सिनेमाचं शूटिंग (Movie Shooting) वगैरे काही नाही, ही खरी घटना आहे, यावर विश्वास बसायला थोडा वेळ गेला. एका मोबाईल चोराला (Mobile Theft) पकडतानाची ही घटना कॅमेऱ्यात (Mobile Camera) कैद झाली आहे. हा संपूर्ण थराराक घटनाक्रम पाहून सोशल मीडियातील लोकंही हैराण झाले आहेत. एका मोबाईल चोर पोलिसाचा चकवा देत पलायन करण्याच्या प्रयत्नात होता. पण पोलिसाच्या चपळाईपुढे चोराची धाव तोकडी पडली आणि पोलिसानं चोराला भर ट्रॅफिकमध्ये आडवा पाडत, त्याच्या मुसक्या आवळल्यात.
नेमकी कुठची घटना?
मंगळुरुतल्या नेहरु मैदान परिसरात तिघांना मोबाईल चोरला. यावेळी घटनास्थळी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक वरुन अल्वा यांनी तत्काळ प्रसंगावधान दाखवल चोरांचा पाठलाग केला. चोर-पोलीस पकडापकडी सुरु झाली. यावेळी मोबाईल चोरीप्रकरणातल्या तिघांपैकी हरीष पुजारी यांच्या मागे पोलीस उपनिरीक्षक वरुन अल्वा यांनी भर ट्रॅफिकमध्ये एखाद्या सिनेमाच्या सीमलाही लाजवेल अशी झटापट करत चोराच्या मुसक्या आवळल्या आहेत.
भर रस्त्यातच अल्वा यांनी चोराला आडवं पाडलं आणि त्याच्या मानगुटावर बसून त्याला अद्दल घडवली. हा सगळा प्रकार पाहून आजूबाजूला असलेल्लाय नागरिकांनाही आधी विश्वास बसेना, की नेमकं झालंय काय? पण नंतर जिवाच्या आकांतानं चोरावर ओरडणाऱ्या पोलिसाला पाहून काही नागरीक धीर करत पुढे आले. त्यांनी चोराचे हात पकडले आणि त्यानंतर पोलिसांनं चोराच्या खिशांमधून पाकीट आणि मोबाईल हस्तगत केले. हा सगळा थरारक प्रकार एकानं आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. या घटनेचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. 13 जानेवारीला मंगळुरु सीटीच्या ट्वीटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे.
पाहा व्हिडीओ –
the way this police officers ran for the theif to catch was mind blowing when i saw this clip on bangalore360 website at first i thought it was a film shoot but this was real one police chasing the theif. hats off to this police officers for their good efforts??
— shyam prasad (@shyamprasad7407) January 14, 2022
दरम्यान, जिवाजी बाजी लावत चोराला पकडणाऱ्या या पोलिसाला 10 हजार रुपयांचं बक्षिसही मंगळुरु पोलीस आयुक्तांनी जाहीर केलंय. या पोलिसाचा सत्कारही करण्यात आला असून सर्व स्तरातून या पोलिसांचं कौतुक होतंय. इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार अटक करण्यात आलेला तरुण हा अनेक चोऱ्यांमध्ये सहभागी असल्याचंही समोर आलंय.
? Viral video of a Mangalore policeman nabbing a mobile phone thief following a dramatic chase in the city.
On Wednesday, 3 men had snatched a mobile phone near Nehru Maidan. After a relentless chase through narrow lanes & wide roads, the policeman finally caught the criminal?? pic.twitter.com/Z0PqdCOOWR
— Mangalore City (@MangaloreCity) January 13, 2022
पोलिसांचं कौतुक
मंगळुरुसोबत काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांचाही एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. कुलाबा पोलिसांनी गेट वे ऑफ इंडियाजवळ समुद्रात बुडणाऱ्या एकाला वाचवतानाचा चित्तथरारक व्हिडीओही समोर आला होता.
#WATCH | A team of Coastal Police & Colaba Police rescued a woman tourist who was drowning in the sea near Gateway of India, Mumbai today. The woman lost control and fell into the water after a strong ocean current hit her boat: Mumbai Police pic.twitter.com/UQFOfMQ8oK
— ANI (@ANI) January 9, 2022
संबंधित बातम्या :
धावत्या गॅस टँकरमध्ये चालक बेशुद्ध, जिगरबाज पोलिसाने शिताफीने टँकर थांबवला, सोलापुरात थरार