AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लग्नाची तारीख ठरली, मॉडेलवर बलात्कार, पीडिता गरोदर होताच नवरदेव पळाला

जेव्हा तिने होणाऱ्या नवऱ्याला आपण गर्भवती असल्याचे सांगितले, तेव्हा ही गोष्ट ऐकून तो चांगलाच संतापला आणि तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकू लागला. या सोबतच त्याने तिला अनेक वेळा मारहाण करून लग्न करण्यासही नकार दिला.

लग्नाची तारीख ठरली, मॉडेलवर बलात्कार, पीडिता गरोदर होताच नवरदेव पळाला
प्रातिनिधीक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 18, 2021 | 11:59 AM
Share

कोलकाता : पश्चिम बंगालच्या दक्षिण 24 परगणा जिल्ह्यात एका मॉडेलवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडितेने बार मॅनेजरविरुद्ध बलात्काराचा आरोप केला आहे. दोघांमध्ये सोशल मीडियावर मैत्री झाल्याचं सुरुवातीच्या तपासात पोलिसांसमोर आले आहे. दोघांनी लग्नाची तारीखही निश्चित केली होती. मात्र, मॉडेलचा आरोप आहे की लग्नाच्या काही महिने आधी आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. ती गर्भवती राहिल्यानंतर आरोपी अचानक परागंदा झाला. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला असून अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही.

काय आहे प्रकरण?

पीडितेने पोलिसांना सांगितले की, जेव्हा तिने प्रियकराला आपण गर्भवती असल्याचे सांगितले, तेव्हा ही गोष्ट ऐकून तो चांगलाच संतापला आणि तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकू लागला. या सोबतच त्याने तिला अनेक वेळा मारहाण करून लग्न करण्यासही नकार दिला. त्यामुळे तिला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यास भाग पडले.

नेमकं काय घडलं?

पीडितेने सांगितले की, लग्नाची तारीख निश्चित करण्यासाठी आरोपीने तिला ऑगस्टमध्ये आपल्या घरी बोलावले होते. जिथे तिच्यावर बलात्कार झाला आणि ती गरोदर राहिली.

सोशल मीडियावरून मैत्री, लग्नही ठरलं

पोलिसांनी या प्रकरणी सांगितले की, दीड वर्षांपूर्वी दोघांची मैत्री सोशल मीडियावरून झाली होती. कालांतराने दोन्ही कुटुंबात चांगले संबंध निर्माण झाले आणि लग्न करण्याचा निर्णय झाला. 29 नोव्हेंबर ही लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली होती, मात्र त्यापूर्वीच मॉडेलने बलात्काराची तक्रार दाखल केली.

पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, अद्याप आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. लवकरच या प्रकरणाचा छडा लावला जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणाशी संबंधित प्रत्येक बाबीकडे लक्ष देऊन तपास करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या :

मशिनमध्ये स्कार्फ अडकला, पुण्यात 21 वर्षीय नवविवाहितेचा मृत्यू

VIDEO | फूटेज असूनही वडील खोट्या केसमध्ये तुरुंगात, दादाचा पत्ता नाही, बदलापूरच्या तरुणीचा ठाकरे सरकारकडे टाहो

फेसबुकवरील मैत्री महागात, नगरमध्ये सरकारी कर्मचाऱ्याची 2 लाख 30 हजारांना फसवणूक

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.