मृतदेह नेणारी गाडी ट्रकवर आदळली, भीषण अपघातात 17 जणांचा मृत्यू, अनेक जण गंभीर
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील बगदा भागातून काही जण मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात होते. यावेळी वाहनात 20 हून अधिक प्रवासी असल्याचे सांगण्यात येते.
कोलकाता : पश्चिम बंगालमधील (West Bengal Accident) नादिया (Nadia) येथे ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी आहेत. पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी मिळून घटनास्थळी मदतकार्य केले. मृतदेह घेऊन जाणारे वाहन स्मशानभूमीकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळल्याने हा अपघात झाला.
नेमकं काय घडलं?
पश्चिम बंगालमधील उत्तर 24 परगणा येथील बगदा भागातून काही जण मृतदेह घेऊन नवद्वीप स्मशानभूमीकडे जात होते. यावेळी वाहनात 20 हून अधिक प्रवासी असल्याचे सांगण्यात येते. मृतदेह नेणारी गाडी हंसखळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुलबारी येथे आली असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर आदळली.
दाट धुक्यामुळे अपघाताचा संशय
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता. मृतदेह घेऊन जाणारे वाहन भरधाव वेगात होते. दाट धुक्यामुळे चालकाला ट्रक दिसला नसावा आणि तो वेगात जाऊन ट्रकला धडकला असावा.
ट्रक आणि वाहन यांच्यात झालेल्या धडकेनंतर परिसर कानठळ्यांनी दुमदुमला. आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली. घटनास्थळी तातडीने मदतकार्य हाती घेण्यात आले. पंधरा मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघातातील काही जखमींची प्रकृतीही गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.
संबंधित बातम्या :
अपघातात पाय गेले, मेकॅनिकने लावला दुचाकी चोरण्याचा सपाटा, 6 महिन्यात 13 वाहने चोरली
‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या प्रेयसीला शेअर मार्केटचे अमिष, 22 लाखांचा गंडा!
2 वर्षाच्या मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडले, नागरिकांच्या हाती लागताच चांगलाच चोपला, औरंगाबादची घटना