तो मस्करी करतोय, असं वाटलं, बायको व्हिडीओ बनवत राहिली, पाहतापाहता तो खरंच पंख्याला लटकला

पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे (woman make video of her husband suicide).

तो मस्करी करतोय, असं वाटलं, बायको व्हिडीओ बनवत राहिली, पाहतापाहता तो खरंच पंख्याला लटकला
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Apr 14, 2021 | 4:44 PM

कोलकाता : पश्चिम बंगालच्या हावडा जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. एक व्यक्ती पंख्याला दोर बांधून गळफास लाऊन आत्महत्या करत होता. त्यावेळी त्याची पत्नी तिथेच उपस्थित होती. मात्र, तिने त्याला आत्महत्येपासून रोखण्याऐवजी त्याचा आत्महत्येचा व्हिडीओ बनवला. हा सगळा प्रकार तिच्या मोबाईलमध्ये कैद झालाय. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे (woman make video of her husband suicide).

मृतक पतीला आरोपी महिलेच्या चारित्र्यावर संशय

आरोपी महिलेच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या व्हिडीओत दोघांमध्ये तिसऱ्या कोणत्यातरी व्यक्तीवरुन वाद सुरु होता, असं समोर येतंय. या दाम्पत्याचं गेल्यावर्षी लग्न झालं होतं. मात्र, दोघांमध्ये चांगले संबंध नव्हते. त्यांच्यात सतत वाद सुरु असायचा. आरोपी पत्नीचं दुसऱ्या कोणत्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध आहेत, असा आरोप पतीकडून सातत्याने केला जायचा. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये सारखा वाद व्हायचा. पतीने जेव्हा आत्महत्या केली तेव्हा देखील याच विषयावर वाद सुरु असल्याची माहिती व्हिडीओतून समोर आली आहे.

पतीच्या आत्महत्येवेळी घरात फक्त पत्नी

आरोपी 22 वर्षीय महिलेचं नाव नेहा शुक्ला असं आहे. तिचं गेल्यावर्षी 11 डिसेंबरला अमिन साव नावाच्या व्यक्तीसोबत लग्न झालं होतं. हे दाम्पत्य पश्चिम बंगालच्या हावडा येथे वास्तव्यास होते. मात्र, आरोपी पत्नी ही अचानक एकटी 31 मार्च रोजी दिल्लीला माहेरी निघून आली होती. त्यानंतर ती 5 एप्रिलला पुन्हा सासरी गेली होती. त्यानंतर 8 एप्रिलला तिचा पत्नी अमिन साव याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या केली त्यावेळी घरात फक्त त्याची पत्नी होती. अमन सावच्या आत्महत्येनंतर त्याचे आई-वडील, बहीण हे सर्व हावडाला आले.

मृतकाच्या बहिणीने खरं समोर आणलं

अमनच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीच्या बोलणंचालणं आणि वागणुकीत फारसा बदल झालेला नव्हता. ती अतिशय आरामात राहत होती. तिच्या चेहऱ्यावर पतीच्या निधनाच्या दु:खाचा लवलेशही दिसत नव्हता. त्यामुळे मृतक पतीच्या बहिणीला म्हणजेच बरखाला संशय आला. यादरम्यान बरखाच्या हातात नेहाचा मोबाईल पडला. तिने तिच्या मोबाईलमध्ये व्हिडीओ बघितले असता तिला धक्काच बसला. नेहाने तिच्या भावाच्या आत्महत्येची घटना मोबाईलमध्ये जसीच्या तशी कैद केल्याची धक्कादायक घटना समोर आली.

आरोपी महिलेला बेड्या

पतीच्या नातेवाईकांनी महिलेला असं का केलं? पतीला आत्महत्या करण्यापासून का वाचवलं नाही? असं विचारलं. तेव्हा तिने पती मस्करी करत आहे, असं वाटलं. पण त्याने खरंच आत्महत्या केली, असं उत्तर तिने दिलं. याप्रकरणी मृतकाचे कुटुंबिय पोलिसात गेले. पोलिसांनी महिलेविरोधात गुन्हा दाखल केला. तसेच कोर्टाने महिलेला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे (woman make video of her husband suicide).

हेही वाचा : प्लॉट व्यावसायिक मर्डर केसचा दहा दिवसात छडा, चार लाखांची सुपारी देऊन हत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.