VIDEO: मुंबईत क्रॉफर्ड मार्केटमध्ये मनसुख हिरेन यांना कोण भेटलं?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाच्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. (who met Mansukh hiren in crawford market?: devendra fadnavis)
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकाच्या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. हिरेन गायब झाल्यापासून ते त्यांचा मृतदेह सापडल्यापर्यंत या घटनेत अनेक योगायोग घडले आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा एनआयएकडून तपास करण्यात यावा, अशी मागणी करतानाच मनसुख हिरेन क्रॉफर्ड मार्केटमध्ये कसे पोहोचले? तिथे ते कुणाला भेटले? याची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. (who met Mansukh hiren in crawford market?: devendra fadnavis)
मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर विरोधी पक्षनेते हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूवर अनेक प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत. मुकेश अंबानींच्या घराबाहेर जी जिलेटिनने भरलेली स्कॉर्पिओ मिळाली होती, ती गाडी मनसुख हिरेन यांची होती. त्यांची गाडी चोरीला गेली होती. त्यांची गाडी बंद झाली तिथून ते क्रॉफर्ड मार्केटला आले होते. आपण क्रॉफर्ड मार्केटला कामानिमित्त गेलो होतो, असं त्यांनी म्हटलं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांची गाडी चोरीला गेली होती. क्रॉफर्ड मार्केटमध्ये हिरेन एका व्यक्तीला भेटले, तो व्यक्ती कोण होता? हे या प्रकरणाचं मूळ आहे. त्याचा व्यक्तीचा शोध घेतल्यास हिरेन प्रकरणाचा पर्दाफाश होईल, असं फडणवीस म्हणाले. ही गाडी जिथे सापडली, तिथे लोकल पोलिसांच्या आधी सचिन वाझे हे कसे पोहोचले? त्यांनाच धमकीची ती चिठ्ठी कशी मिळाली.
ठाण्याशीच लिंक कशी?
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचं घर ठाण्यात आहे. जी गाडी चोरी झाली ती सुद्धा ठाण्यातच सापडली. इतकंच नाही, जी गाडी चोरी होऊन ज्या रुटने आली आणि तिथे पार्क झाली, तिच्यासोबत सफेद इनोव्हा ठाण्यातूनच आली. एक गाडी पार्क झाली आणि एक निघून गेली. त्याच सचिन वाझे यांना या प्रकरणात तपास अधिकारी म्हणून नेमलं आहे. हे आश्चर्यकारक आहे, असं फडणवीस म्हणाले.
वाझे क्रॉफर्ड मार्केटला पोहोचले कसे?
हिरेन बेपत्ता झाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि इतर कुणीही क्रॉफर्ड मार्केटला पोहोचले नाहीत. सचिन वाझे सगळ्यात आधी तिथे पोहोचले. त्यांनाच तिथे त्यांना चिठ्ठी सापडली. त्यांनाच चौकशी अधिकारी नेमलं. आश्चर्य म्हणजे जून-जुलैमध्ये २०२० मध्ये सचिन वाझेंचं या गाडी मालकाशी संभाषण झालं होतं. योगायोग म्हणजे गाडीमालक ठाण्यातले, आयओ ठाण्यातले, ही गाडी ठाण्यातली, त्याच्यासोबत एक गाडी आली ती ठाण्यातूनच आली. त्यापेक्षा संशयास्पद बाब म्हणजे एका टेलिग्राम चॅनलवर जयशूल हिंदच्या नावाने आम्हीच हे कृत्य केल्याचं म्हटलं गेलं. ही गाडी आम्ही ठेवलीय, आम्हाला रॅनसम द्या, क्रिप्टो करन्सी द्या असं पत्र प्रसिद्ध झालं. त्याच्या दुसऱ्या दिवशी जयशूल या संघटनेने एक मेल पाठवून या घटनेशी आमचा काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.
व्हॉट्सअॅप चॅट चेक करा
यामध्ये मी एक शक्यता वर्तवली होती, यातील सर्वात महत्त्वाचा दुवा मनसुख हिरेन हे होते. त्यांना तात्काळ सुरक्षा द्यायला हवी. मला आताच माहिती मिळाली, मनसुख हिरेन यांची बॉडी ठाण्याजवळ मुंब्र्याच्या जवळपास सापडली आहे, त्यामुळे हे प्रकरण गंभीरच नाही तर अत्यंत गुंतागुंतीचं आणि सर्वांकरिता चॅलेंजिग आहे. मला वाटतं हा जो योगायोग आहे, यातून जो संशय तयार झालाय आणि इतका प्राईम विटनेसची बॉडी मिळते, निश्चितच यामध्ये काही गौडबंगाल आहे. त्यामुळे ही केस तात्काळ एनआयएला दिली पाहिजे आणि यामागील सत्य बाहेर यायला हवं, असं सांगतानाच हिरेन यांची व्हॉट्सअॅचॅट तपासण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. (who met Mansukh hiren in crawford market?: devendra fadnavis)
संबंधित बातम्या:
मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकाने भरलेल्या स्कॉर्पिओ मालकाचा मृतदेह सापडला
धनंजय मुंडेंच्या कारभाराने बीड जिल्ह्याची मान खाली, पंकजा मुंडे यांचा बोचरा वार
(who met Mansukh hiren in crawford market?: devendra fadnavis)