हवेली नंबर D-40, साडे पाच कोटींची डील, एक चूक आणि… हादरवणाऱ्या ‘त्या’ हायप्रोफाईल हत्याकांडाची इन्साईड स्टोरी

माणूस कधी कोणत्या थराला जाईल याचा काही नेम नसतो. अगदी क्षुल्लक कारणावरून त्याच्या रागाचा पारा चढतो आणि नंतर होत्याचं नव्हतं होतं. डोक्यात रागाचं थैमान असलं की त्याच्या हातून कोणताही गुन्हा घडू शकतो. आता हेच पाहा ना...

हवेली नंबर D-40, साडे पाच कोटींची डील, एक चूक आणि... हादरवणाऱ्या 'त्या' हायप्रोफाईल हत्याकांडाची इन्साईड स्टोरी
Renu SinhaImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 11, 2023 | 11:42 PM

नवी दिल्ली | 11 सप्टेंबर 2023 : हवेली नंबर डी-40. 5.7 कोटींची डील आणि सर्वोच्च न्यायालयातील एका महिला वकिलाचा मृत्यू… एका हायप्रोफाईल हत्याकांडाची ही कहाणी दिल्लीच्या बाजूलाच असलेल्या नोएडाची आहे. रेनू सिन्हा असं या महिला वकिलाचं नाव आहे. नितीन नाथ सिन्हा हा तिचा पती आहे. नितीन सिन्हा हा निवृत्त आयआरएस अधिकारी आहे. त्यानेच रेनूची हत्या केली. त्यानंतर घराच्या बाहेर बाथरूममध्ये मृतदेह लपवला. नंतर आपली अलिशान हवेली विकून तो परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होता. पण हवेली खरेदी करणाऱ्याला संशय आला आणि नितीनच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरले. नितीनची पोलखोल झाली. आज नितीन तुरुंगात आहे. इथपर्यंत तुम्हाला या हत्येची संक्षिप्त माहिती मिळाली. पण खरी हकीकत तर पुढेच आहे.

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगर (नोएडा)मधील हे प्रकरण आहे. नोएडाच्या सेक्टर -30मध्ये नितीन सिन्हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. तो निवृत्त आयआरएस अधिकारी आहे. त्याची पत्नी रेनू सिन्हा या सर्वोच्च न्यायालयाच्या वकील होत्या. नितीन ज्या डी-40 हवेलीत राहत होता, त्याला ती हवेली विकायची होती. 10 डिसेंबर रोजी त्याच्या घरी काही प्रॉपर्टी डीलर आले होते. त्यावेळी नितीन घरी एकटाच होता. प्रॉपर्टी डीलर 20 मिनिटे त्याच्या घरी थांबले. हवेली विकण्याची चर्चा सुरू झाली. आणि 5.7 कोटीमध्ये डील फायनल झाली.

म्हणून अॅडव्हान्स दिला नाही

अंतेश भंडारी यांना ही हवेली खरेदी करायची होती. त्यांनी नितीनशी चर्चा केली. त्यावेळी अंतेश यांना नितीनच्या अनेक गोष्टी खटकल्या. त्यानंतर काही तरी कारण सांगून अंतेश तिथून निघून गेले. अंतेशच्या सांगण्यानुसार, नितीनला हवेली विकून परदेशात जायचे होते. तो स्वत: वारंवार फोन करून प्रॉपर्टी डीलरला त्रास देत होता. नितीनने यावेळी आपल्या कुटुंबीयांबाबत काहीच माहिती दिली नाही.

मला अॅडव्हान्स द्या आणि हवेलीची नोंदणी करून घ्या. पण हे काम लवकरात लवकर करा, असं तो संगायचा. पण काही तरी काळंबेरं असल्याचं जाणवू लागल्याने मी त्यांना अॅडव्हान्स दिले नाही. आजचा दिवस बरोबर नाही. नंतर पुन्हा येईल असं सांगून आम्ही निघून गेलो.

रेनूच्या बहिणीचे दोन दिवसांपासून फोन

नितीनला हवेली विकण्याची घाई तरी का झाली होती? हा सवाल निर्माण होणं स्वाभाविक आहे. पण जेव्हा पोलीस नितीनच्या घरी गेले तेव्हा या प्रश्नाचा उलगडा झाला. रेनूची बहीण तिला दोन दिवसांपासून फोन करत होती. पण ती फोन उचलत नव्हती. काही तरी गडबड असल्याचा संशय निर्माण झाल्याने तिने पोलिसात तक्रार दिली.

त्यानंतर पोलीस नितीनच्या घरी गेले आणि त्यांनी झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. तपास करता करता पोलीस बाथरूममध्ये गेले. तेव्हा समोरचं दृश्य पाहून पोलीस हादरून गेले. बाथरूममध्ये रेनूचा मृतदेह पडलेला होता. सर्वत्र रक्तही सांडलेलं होतं. दोन तीन दिवसापासून मृतदेह पडल्याचं जाणवत होतं.

हायप्रोफाईल मर्डर असल्याचं जाणवल्याने पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली. त्यानंतर डीसीपी हरीश चंद्र घटनास्थळी आले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली. सुरुवातीला पोलिसांनी सीसीटीव्ही तपसाले. त्यानंतर हवेलीतील एका एका खोलीचा तपास केला. त्यानंतर पोलीस स्टोअर रूमपर्यंत गेली. पण स्टोअर रुम बंद होता. पोलिसांनी स्टोअर रुम तोडला. तेव्हा आत नितीन बसलेला दिसला. पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली.

भावाने दिली खबर

आम्हाला रविवारी संध्याकाळी 4 ते 5 च्या सुमारास ही माहिती मिळाली. नोएडा सेक्टर -30 मध्ये एका महिलेचा मृतदेह सापडल्याची खबर मिळाली. या महिलेच्या भावाने आम्हाला ही माहिती दिली. त्याच्या तक्रारीनवरून आम्ही एफआयआर दाखल केला आणि पोलिसांच्या चार टीम तपास कामाला लावल्या. फॉरेन्सिक चौकशी आणि सीसीटीव्ही पाहिल्यानतंर आम्ही नितीनला अटक केली, अशी माहिती डीसीपी हरीश चंद्र यांनी दिली.

नितीनला हवेली विकायची होती. पण या हवेलीत रेनू राहत होती. त्यामुळे दोघांमध्ये वादही झाला होता. यावेळी नितीनने संतापच्या भरात रेनूचा गळा दाबला. त्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाल्याचं हरीश चंद्र यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.