पूजा चव्हाणला नेमकं काय झालं होतं? ती स्ट्रीप रेड का झाली?; कथित मंत्री का घाबरला?
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबधित कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. (why Pooja Chavan taking suicide step?)
मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबधित कथित ऑडिओ क्लिप्स व्हायरल झाल्या आहेत. त्यात एका कथित मंत्र्याचं आणि त्याच्या कार्यकर्त्याचं संभाषण असल्याने या प्रकरणावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच यात पूजा चव्हाणच्या ट्रिटमेंटबाबत हे दोघेही बोलत असल्याने पूजाला नेमंक काय झालं होतं? त्यामुळे मंत्री का घाबरला? याबाबतचंही गूढ वाढलं आहे. (why Pooja Chavan taking suicide step?)
मूळची बीड येथील असलेल्या आणि पुण्यात राहणाऱ्या पूजा चव्हाणने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पूजा ही सामाजिक कार्यकर्ती होती. शिवाय बंजारा समाजातील शिकलेली तरुणी होती. तिने अचानक आत्महत्या केल्याने या आत्महत्येप्रकरणी एका मंत्र्यावर संशय व्यक्त केला जात आहे. त्यातच या मंत्र्याच्या आणि त्यांचा कार्यकर्ता अरुण राठोड यांच्या क्लिप्स व्हायरल झाल्याने संशय अधिकच वाढला आहे. या एकूण 11 ऑडिओ क्लिप असून त्यात पूजाबाबतची अनेक बरीच धक्कादायक माहिती मिळत आहे.
काय आहे संभाषण?
अरुण: तिने किट आणली आणली आणि टेस्ट केली. रेड पट्टी झाली. पॉझिटीव्ह आली. एकदमच धडधड झाली. काय करू आणि काय नको असं झालं. घामच फुटला. रुममध्ये आल्यावर कालच माझं आधार कार्ड घेतलं होतं. तिला समजून सांगणं गरजेचं आहे. नाही तर ती भलतीच माथेफिरू… सायको आहे. तिला एकदम कन्व्हिन्स केलं पाहिजे.
मंत्री: हे सगळं झालं की इतक्या लांब जाईल की मला स्वप्नातही दिसलं नाही. म्हटलं तुझं स्वप्नं कर पूर्ण. पण ती दुसऱ्याच मार्गावर गेली. त्यात माझी थोडीच चूक आहे. माझी प्रतिमा… माझी इज्जत…हां… माझ्यामागे एवढा समाज आहे.
अरुण: लोकांना काय विषय चघळायला पाहिजे
मंत्री: मला तर काही कळतच नाही. मला तर जीवच द्यावा लागेल अशी परिस्थिती आहे.
अरुण: तुम्हाला काही होणार नाही. टेन्शन घेऊ नका. मी करेल सर्व बरोबर. मी समजावतो ना नंतर.
मंत्री: तू आधी सगळं सांभाळ. मी येतो नंतर…
अरुण: ठिक आहे.
उपचार झाल्यावरही आत्महत्या करणार
यातील एका क्लिपमध्ये कथित मंत्री आणि अरुण यांच्यात सुरू असलेल्या संवादातून पूजा कसली तरी ट्रिटमेंट घेत असल्याचं स्पष्ट होतं. तिची स्ट्रीप रेड झाल्याचं अरुण मंत्र्याला सांगतो तेव्हा हा मंत्री अधिकच घाबरून गेलेला दिसतो. पूजाच्या स्ट्रीप रेड होण्याचं आणि मंत्र्याचा काय संबंध? असा सवालही या निमित्ताने निर्माण झाला आहे. स्ट्रीप रेड झाल्यामुळेच तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो. स्ट्रीप रेड झाल्यामुळेही पूजा आत्महत्या करण्याच्या निर्णयावर ठाम होती? तिने असा निर्णय का घेतला? त्यावर काही उपाय नव्हता का? असा सवालही या निमित्ताने उपस्थित होत आहे. तिने आत्महत्या करू नये म्हणून मंत्री आणि हा कार्यकर्ता तिला ट्रिटमेंट घ्यायला सांगत होता. वारंवार आग्रह केल्यानंतर ती ट्रिटमेंट घ्यायला तयारही झाली. पण ट्रिटमेंट केल्यानंतरही मी आत्महत्या करणार असल्याचं तिने अरुणला सांगितलं होतं. त्यामुळे ही ट्रिटमेंट काय होती? कोणत्या कारणामुळे तिला आत्महत्या करण्यास भाग पाडलं आणि कथित मंत्र्याची ती कार्यकर्ती होती का? असे सवाल या निमित्ताने केले जात आहेत.
मंत्री घाबरला
पूजाला अनेकदा समजावूनही ती आत्महत्या करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचं अरुणने मंत्र्याला सांगितल्यानंतर हा मंत्री घाबरला होता. त्यानंतर पूजाने आत्महत्या केल्याचं सांगितल्यावर तर हा मंत्री अधिकच घाबरला. काहीही कर पूजाचा मोबाईल मिळव. दरवाजा तोड, गॅलरीत चऱ्हाट (दोरी) टाकून जा, पण तिचा मोबाईल मिळव. दरवाजा तोडताना आवाज आला तरी चालेल पण मोबाईल मिळव, असं हा मंत्री अरुणला सांगत असल्याचं या संभाषणातून ऐकायला मिळतं. विशेष म्हणजे पूजाच्या मृत्यूनंतर झालेल्या प्रत्येक कॉलमध्ये हा मंत्री पूजाचा मोबाईल मिळवण्यावर अधिक भर देत असल्याचंही ऐकायला मिळतं. हा मंत्री पूजाचा मोबाईल का मागत होता? त्यात मोबाईलमध्ये असं काय आहे की जेणेकरून मंत्र्याला मोबाईल हवा होता? पूजा आत्महत्याप्रकरणाशी या मंत्र्याचा संबंध नाही तर मग मोबाईल मागण्यावर मंत्र्याचा जोर का? असे सवालही या निमित्ताने उपस्थित केले जात आहेत. (why Pooja Chavan taking suicide step?)
मंत्री टेन्शनमध्ये का?
पूजाने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याने हा मंत्री टेन्शनमध्ये आल्याचं क्लिपमधील संभाषणातून स्पष्ट होतं. मला एक तर टेन्शन आलंय. आधीच मी परेशान आहे. घराचं टेन्शन आहे. समजव तिला. तूच तिला कन्व्हिन्स करू शकतो, असं मंत्री एका संभाषणात अरुणला सांगतात. त्यावर अरुण तिला कन्व्हिन्स करणार असल्याचं सांगतो. पण पूजा सर्किट (हट्टी) असल्याचंही सांगतो. त्यामुळे मंत्र्याचं टेन्शन अधिकच वाढतं. माझ्या घरी काय चालू आहे माझं मलाच माहीत. घर डिस्टर्ब झालंय माझं. मला माहीत मी किती परेशान आहे. तिला समजाव तू, असंही मंत्री सांगतात. यावरून या मंत्र्याच्या कुटुंबीयांनाही हे प्रकरण माहीत असावं आणि त्यामुळे मंत्री टेन्शनमध्ये आले असावे असं स्पष्ट होतं. (why Pooja Chavan taking suicide step?)
विशेष टीप: हा सर्व व्हायरल क्लिप्सचा मजकूर आहे. ‘टीव्ही 9 मराठी’ आणि ‘टीव्ही 9 मराठी वेब’ याची पृष्टी करत नाही.
संबंधित बातम्या:
पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी भाजप आक्रमक, संबंधित मंत्र्याचं ‘राठोडगिरी’ असं नाव घेत पहिल्यांदाच थेट मुख्यमंत्र्यांना आव्हान
परळीची तरुणी, पुण्यात आत्महत्या, विदर्भातल्या मंत्र्याचं कनेक्शन? चौकशीसाठी भाजप आक्रमक
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सत्य का लपवताय? ठाकरे सरकारला फडणवीसांचा सवाल
(why Pooja Chavan taking suicide step?)