मुलीने आधी रेस्टॉरंटमध्ये पोटभर खाऊ घातलं, मग दारु पाजली, नंतर वडिलांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं, थरार सीसीटीव्हीत कैद

मुलीने आपल्या वडिलांच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे (woman burned her father after taking him out for dinner in Kolkata).

मुलीने आधी रेस्टॉरंटमध्ये पोटभर खाऊ घातलं, मग दारु पाजली, नंतर वडिलांच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं, थरार सीसीटीव्हीत कैद
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 4:15 PM

कोलकाता : पश्चिम बंगालच्या कोलकाता शहरात एक विचित्र घटना घडली आहे. एका मुलीने आपल्या वडिलांच्या अंगावर रॉकेल टाकून जाळून टाकल्याची घटना समोर आली आहे. संबंधित पित्याचं शरीर जास्त भाजल्याने त्याची जाग्यावरच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मुलीला अटक केली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय (woman burned her father after taking him out for dinner in Kolkata).

नेमकं प्रकरण काय?

संबंधित आरोपी मुलगी ही कोलकात्याच्या पार्क सर्कस जवळ क्रिस्टोफर रोड भागात वास्तव्यास आहे. आरोपी तरुणी 22 वर्षांची आहे. तिने रविवारी (21 मार्च) रात्री आपल्या वडिलांना गोड बोलून रेस्टॉरंटमध्ये नेलं. तिथे तिने वडिलांना पोटभर जेवू घातलं. त्यानंतर वडिलांना तिने प्रचंड दारु पाजली. नंतर ते घराकडे निघाले. दरम्यान, वाटेवर तिचे वडील हुगली नदीच्या किनाऱ्यावर एका टेबलावर बसले. तिथेच त्यांना झोपही लागली. त्यानंतर मुलीने तिच्या वडिलांवर रॉकेल टाकले आणि पेटवून दिले. यामध्ये तिचे वडील होरपळून मेले.

घटना सीसीटीव्हीत कैद

हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत चोखपणे कैद झालाय, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याशिवाय मुलीने आपला गुन्हा देखील कबूल केला आहे. मुलीच्या काकांनी तिच्याविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली (woman burned her father after taking him out for dinner in Kolkata).

मुलीने वडिलांचीच हत्या का केली?

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. मुलीने आपल्याच वडिलांची हत्या का केली? असा सवाल उपस्थित केला जातोय. दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलीची चौकशी केली असता तिने आपल्या वडिलांवर लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. ती लहान असताना तिच्या आईचं निधन झालं होतं. त्यानंतर तिच्या वडिलांनी तिचं लैंगिक शोषण केलं. मुलीच्या लग्नानंतर संबंधित प्रकार बंद झाला होता. मात्र, मुलीचं लग्न मोडल्यानंतर ती तिच्या माहेरी आली. त्यानंतर तिच्या वडिलांनी पुन्हा तसं दुष्कृत्य करण्यास सुरुवात केली, असं आरोपी मुलीने पोलिसांना सांगितलं आहे.

आरोपी मुलीची सध्या चौकशी सुरु आहे. तिने सांगितलेली माहिती कितपत खरी आहे याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, कोर्टाने आरोपी महिलेला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा : दोन दिवसांपासून कॉलेजमधून बेपत्ता, अर्धवट जळालेला तरुणीचा मृतदेह सापडला

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.