अनैतिक संबंधातून महिलेकडून प्रियकराचीच हत्या!, लातूरमधील धक्कादायक घटना
शबाना हणमंतच्या सततच्या त्रासाला कंटाळली होती. पुढे शबानाचे संतोष धोंडीराम घाडगे याच्याशी सूत जुळले. संतोष आणि शबाना यांच्यातील अनैतिक संबंध वाढत गेले. हणमंत याच्या वाढत्या त्रासाला कंटाळून शबाना आणि संतोष यांनी हणमंत येरवे याचा काटा काढण्याचा कट रचला.
लातूर : अनैतिक संबंधातून (Immoral relations) एका 40 वर्षीय व्यक्तीची हत्या झाल्याची घटना लातूरच्या (Latur) चाकूरमध्ये घडली आहे. महत्वाची बाब म्हणजे ही हत्या मृत व्यक्तीच्या प्रेयसीनेच घडवून आणल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या 12 तासांत आरोपी महिलेसह तिच्या दोन साथिदारांना अटक केली आहे. चाकूर पोलीस ठाण्यात (Chakur Police Station) आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकूर येथील हणमंत येरवे (वय – 40) यांचे लातूररोड येथील शबाना मासुलदार हिच्याशी शारिरिक संबंध होते. परिणामी, शबाना, मुलगी आणि पती हे मागील 10 वर्षापासून विभक्त राहत होते. कालंतराने हणमंत हा शबानाला दारू पिऊन त्रास देऊ लागला. शबाना हणमंतच्या सततच्या त्रासाला कंटाळली होती. पुढे शबानाचे संतोष धोंडीराम घाडगे याच्याशी सूत जुळले. संतोष आणि शबाना यांच्यातील अनैतिक संबंध वाढत गेले. हणमंत याच्या वाढत्या त्रासाला कंटाळून शबाना आणि संतोष यांनी हणमंत येरवे याचा काटा काढण्याचा कट रचला.
डोळ्यात मिरची पूड, डोक्यात लोखंडी रॉडने वार
त्यानुसार शबानाने हणमंतला रविवारी सायंकाळी दुचाकीवरुन चाकूर येथे घेऊन गेली. लातूररोड नजीकच्या एका धाब्याजवळ दुचाकी सोडण्यात आली. तेथून आष्टा शिवारातील घरणी रेल्वे स्टेशन समोर ते गेले. त्यावेळी शबानाने मोबाईलवरुन एका व्यक्तीशी संपर्क केला. त्या व्यक्तीने हणमंत याच्याशी चर्चा केली. तेथून ते मोहदळ भागातील अडवळणावर गेले. तेथे दबा धरुन बसलेल्या संतोष धोंडीराम घाडगे (वय-25 रा. शिवणखेड ता. चाकूर) आणि लक्ष्मण बब्रुवान डांगे (वय – 38 रा. आष्टा ता. चाकूर) यांनी हणमंत येरवे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. डोक्यात लोखंडी रॉडने जबर वार करुन हत्या करण्यात आली. या हत्येचा उलगडा सोमवारी दुपारी झाला. एका शेतकऱ्यांने मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना याची माहिती दिली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस अधिक्षक निकेतन कदम, पोलिस निरिक्षक बालाजी मोहिते यांनी भेट देवून पाहणी केली.
12 तासांत आरोपी अटकेत
पोलिसांनी आपली तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या बारा तासात आरोपी महिलेसह तिघांच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणाची अधिक चौकशी केली असता, त्यांनी हत्येची कबुली दिली. याबाबत शबाना मासुलदार, लक्ष्मण डांगे आणि संतोष घाडगे याला अटक करण्यात आली. याबाबत चाकूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
इतर बातम्या :