आधी चोरीचा कट रचला, स्वत:च्या घरातील महिलांच्या गळ्याला चाकू लावला, नंतर पोलिसातही धाव, नाटकी महिलेचा भांडाफोड

प्रियकराच्या मदतीसाठी स्वत:च्याच घरात चोरीचा प्रकार घडवल्याचा आश्चर्यजनक आणि विचित्र प्रकार बारामतीत उघड झालाय (Woman plots theft in her own house to help boyfriend in Baramati).

आधी चोरीचा कट रचला, स्वत:च्या घरातील महिलांच्या गळ्याला चाकू लावला, नंतर पोलिसातही धाव, नाटकी महिलेचा भांडाफोड
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 10:10 PM

बारामती (पुणे) : प्रियकराच्या मदतीसाठी स्वत:च्याच घरात चोरीचा प्रकार घडवल्याचा आश्चर्यजनक आणि विचित्र प्रकार बारामतीत उघड झालाय. बारामती शहरातील फलटण रस्त्यावर गॅरेज चालकाची पत्नी आणि सून यांच्या गळ्याला चाकू लावून आठ लाखांचा मुद्देमाल दोन अज्ञात चोरांनी चोरुन नेल्याची घटना घडली. यामध्ये साडे सहा लाखांची रोकड आणि दीड लाखांच्या दागिन्यांचा समावेश होता. घरातील एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीसाठी हे कटकारस्थान रचलं त्यानंतर ती स्वत:हून पोलिसात तक्रारीसाठी गेली. विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर अवघ्या तीनच तासात बारामती पोलिसांनी या चोरीचा तपास लावला (Woman plots theft in her own house to help boyfriend in Baramati).

नेमकं प्रकरण काय?

बारामतीतील फलटण रस्त्यावर रविवारी (14 मार्च) सासू आणि सुनेच्या गळ्याला चाकू लाऊन साडेसहा लाख रुपये रोख आणि दीड लाख रुपये किमतीचे सोने चोरुन नेल्याचा प्रकार घडला. याबाबत एका महिलेने फिर्याद दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला. त्यामध्ये लखन गोपाळ भोसले (वय ३०, रा. निरावागज, ता. बारामती) यानं हा प्रकार केल्याचं निष्पन्न झालंय.

पोलीस काय कारवाई करणार?

विशेष म्हणजे, संबंधित फिर्यादी महिलेनंच आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या प्रियकरासाठी स्वत:च्याच घरी चोरी घडवल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी फिर्यादीच्या विरोधात न्यायालयात तक्रार दाखल करण्याची तयारी सुरु केलीय.

प्रेमासाठी कायपण, अशी एक म्हण आहे. बारामतीत काल घडलेल्या या प्रकारानं या म्हणीचा प्रत्यय पोलिसांना आला. मात्र या प्रकारामुळं पोलिसांची चांगलीच धावपळ झाली (Woman plots theft in her own house to help boyfriend in Baramati).

हेही वाचा ; Mumbai Pune Corona Report : मुंबई, पुण्यात रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ, लॉकडाऊन नको असेल तर काळजी घ्या! 

99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.