पतीला सोडलं प्रियकराचा हाथ धरला, भांडणानंतर पुन्हा घराची वाट, नंतर प्रियकराने जे केलं ते धक्कादायक !
प्रेयसीसोबत येत नाही या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (Woman's boyfriend kidnaps her three-year-old daughter).
कल्याण (ठाणे) : प्रेयसीसोबत येत नाही या रागातून प्रियकराने प्रेयसीच्या तीन वर्षीय मुलीचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित घटना ही डोंबिवलीत घडली आहे. या घटनेची तक्रार पीडित महिलेने मानपाडा पोलीस ठाण्यात केली. महिलेच्या तक्रारीला गांभिर्याने घेत मानपाडा पोलिसांनी तपास केला. या तपासात पोलिसांना यश आलं. पोलिसांनी महिलेच्या तीन वर्षीय मुलीचं अपहरण करणाऱ्याला शोधून काढलं. महिलेच्या प्रियकरानेच तिच्या तीन वर्षीय मुलीला अपहरण केल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेकांना धक्का बसला (Woman’s boyfriend kidnaps her three-year-old daughter).
नेमकं प्रकरण काय?
डोंबिवली पूर्व भागात राहणाऱ्या एका महिलेची दिनेश तिवारी नावाच्या व्यक्तिसोबत मैत्री होती. याच मैत्रीतून त्यांच्यात बोलणंचालणं वाढलं. ते एकमेकांच्या संपर्कात जास्त येऊ लागले. त्यातूनच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. मात्र, महिला ही विवाहित होती. तिला दोन लहान मुली आहेत. तरीही तिने प्रेमात संसाराचा त्याग केला. ती प्रियकर दिनेश तिवारीसोबत राहू लागली. मात्र, काही दिवसांनी दोघांमध्ये छोट्या-छोट्या कारणांनी वाद होऊ लागले. सातत्याने वाद सुरु असल्याने महिला वैतागली आणि तिने आरोपी दिनेश तिवारी याची साथ सोडली. तिने आपल्या पतीची माफी मागितली आणि ती पतीसोबत राहू लागली.
आरोपी दिनेश तिवारी महिलेच्या घरी
काही दिवसांनी आरोपी दिनेश तिवारी महिलेच्या घरी आला. तिने पु्न्हा आपल्यासोबत यावा यासाठी त्याने हट्ट धरला. मात्र महिलेने दिनेश सोबत जाण्यास नकार दिला. या रागातून दिनेशने तिला त्रास देण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने तिच्या मुलीचं अपहरण करण्याचा कट आखला. त्याने महिलेच्या तीन वर्षीय मुलीचं अपहरण केलं. ती मुलगी खेळत असताना त्याने चॉकलेटचं आमिष दाखवून तिचं अपहरण केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत पोलिसांचा तपास सुरु आहे.
महिलेकडून मुलीचा शोध
दरम्यान, थोड्या वेळाने आपली लहान मुलगी घरात आणि घराबाहेर दिसत नाही म्हणून महिलेने मुलीला शोधायला सुरुवात केली. मात्र, तिला मुलगी कुठेच सापडली नाही. महिलेच्या आजूबाजूचे मुलीला शोधण्यासाठी मदत करु लागले. अथक प्रयत्न करुन, शोधाशोध करुनही मुलगी न सापडल्याने महिलेने पोलिसात जाण्याचा निर्णय घेतला.
पोलिसांकडून सहा तासात मुलीचा शोध
महिलेने मानपाडा पोलीस ठाणे गाठले. तिथे आपली तक्रार केली. यावेळी पोलिसांनी महिलेला सविस्तर माहिती विचारली. यावेळी महिलेना आपला आरोपी दिनेश तिवारी या इसमाशी वाद झाल्याचं सागितलं. या एकाच माहितीच्या धाग्यावर पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवले. त्यानंतर अवघ्या सहा तासात पोलीस अधिकारी श्रीकृष्ण गोरे यांच्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या. दरम्यान, पोलिसांनी तीन वर्षाच्या चिमुकलीस तिच्या आईच्या स्वाधीन केलं आहे (Woman’s boyfriend kidnaps her three-year-old daughter).
हेही वाचा : आधी रेमडेसिवीरचे पैसे घ्यायचे, नंतर पोलिसांचा धाक, भामट्यांपासून सावध राहा !