Jalgaon | ‘करणी केल्यानेच गाय मेली,’ ओल्या वस्त्रानिशी महिलेला मूर्तीवर टाकायला लावले पाणी

गायीवर करनी केल्याने तिचा मृत्यू झाला असा संशय बाळून एका महिलेला ओल्या वस्त्रानिशी मंदिरात पाणी घालायला लावण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पाचोरा पोलिसात पिडीतेच्या दीरासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jalgaon | 'करणी केल्यानेच गाय मेली,' ओल्या वस्त्रानिशी महिलेला मूर्तीवर टाकायला लावले पाणी
JALGOAN
Follow us
| Updated on: Nov 29, 2021 | 5:38 PM

जळगाव : पाचोरा तालुक्यातील सारोळा येथे अंधश्रद्धेला बळी पडल्यामुळे धक्कादायक घटना घडलीय. गायीवर करणी केल्याने तिचा मृत्यू झाला असा संशय बाळगून एका महिलेला ओल्या वस्त्रानिशी मंदिरात पाणी घालायला लावण्यात आलंय. या धक्कादायक प्रकारानंतर पाचोरा पोलिसात पीडितेच्या दीरासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अंधश्रद्धेला बळी पडू नका असे अनेक सामाजिक संस्था तसेच राज्य सरकारकडून सांगितले जाते. त्यासाठी राज्यात कठोर कायदेदेखील करण्यात आले आहेत. असे असताना जळगावात ही घटना घडलीय.

अंगावर पाणी टाकून मूर्तीवर पाणी टाकण्यास सांगितले

मिळालेल्या माहितीनुसार सारोळा येथे रमेश धोंडू पाटील व पत्नी रंजनाबाई वास्तव्यास आहेत. गायीवर करनी केल्याच्या संशयावरुन दीर देवीदास धोंडू पाटील यांच्यासह इतर ग्रमास्थ रंजनाबाई यांच्या घरासमोर आले. त्यांनी रंजनाबाई यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांचे पती रमेश धोंडू पाटील आणि खुद्द रंजनाबाई यांच्या अंगावर पाणी टाकण्यात आले. या दोघांनाही अंगावरच्या ओल्या कपड्यानिशी देवाच्या मूर्तीवर पाणी टाकायला लावण्यात आले. जादू टोण्यातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे.

पाचोरा पोलिसात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल

याप्रकरणी रंजनाबाई यांचे दीर देवीदास पाटील, मंगलाबाई पाटील, गणेश देवीदास पाटील, ज्योती देवीदास पाटील, अनिल देवीदास पाटील यांच्याविरोधात पाचोरा पोलिसात जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी घटनेला दुजोरा दिलेला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यामुळे पालीस पुढचा तपास करत आहेत.

दरम्यान, या प्रकारामुळे जळगाव जिल्ह्यातील सारोळा पंचक्रोशीत एकच चर्चा सुरु आहे. करणीसारख्या काल्पनिक प्रकाराचा आधार घेत एका महिलेला त्रास देणे चुकीचे असल्याची भावना व्यक्त होतोय.

इतर बातम्या :

मालमत्तेच्या वादातून तरुणाची गळा चिरून हत्या, बंद घरात बेडवर आढळला मृतदेह

Aurangabad: मुलीचे अपहरण करून कपाटात कोंडणारा आरोपी कोठडीत, यापूर्वीही एका बलात्कारात दोषी!

सोशल मीडियावरुन ओळख, तरुणीवर बलात्कार, अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.