Love Crime | आधी विवाहित महिलेशी संबंध, नंतर लग्न करुन खून, तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ?

तरुणाने महिलेची गळा दाबून हत्या (Woman Murder) केली असून तो फरार आहे. पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडील आहे. मंगळवारी म्हणजेच 25 जानेवारी रोजी हे हत्याकांड घडले.

Love Crime | आधी विवाहित महिलेशी संबंध, नंतर लग्न करुन खून, तरुणाने टोकाचे पाऊल का उचलले ?
सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jan 27, 2022 | 10:42 AM

पटणा : प्रेम या पवित्र संकल्पनेला काळं फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारमध्ये विवाहित महिलेशी प्रेमाचे नाटक (Love) करुन लग्न करुन तिची एका तरुणाने केली आहे. ही घटना पटना जिल्ह्यातील बाढ अनुमंडलमधील बुढनिचक येथील आहे. तरुणाने महिलेची गळा दाबून हत्या (Woman Murder) केली असून तो फरार आहे. पोलीस (Police) त्याचा शोध घेत आहेत. मात्र या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. मंगळवारी म्हणजेच 25 जानेवारी रोजी हे हत्याकांड घडले.

नेमका प्रकार काय आहे ?

मिळालेल्या माहितीनुसार बुढनिचक गावात एक विवाहित महिला राहत होती. याच महिलेच्या घराशेजारी नीरज नावाचा तरुण राहतो. महिलेचा पती नाशिकमध्ये कामानिमित्त वास्तव्यास असल्यामुळे ती महिला आपल्या घरी एकटीच रहायची. याच गोष्टीचा फायदा घेत आरोपी नीरज महिलेच्या घरी सारखं जायचा. नीरज सारखा येत असल्यामुळे महिला तरुणाच्या प्रेमात पडली. त्यानंतर दोघेही एकमेकांसोबत राहण्याची शपथ घेऊ लागले.

लग्न करुन तरुण महिलेसोबत राहू लागला 

दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. या काळात आजूबाजूला कुरुबूर होऊ लागल्यामुळे दोघांनीही विवाह करण्याचं ठरवलं. त्यानंतर दोघांनीही एका मंदिरात विवाह केला. लग्न केल्यानंतर दोघांचाही संसार सुरु झाला. रितसर लग्न झाल्यामुळे महिला आपले सासर म्हणजेच नीरजच्या घरी जाण्यासाठी हठ्ठ धरू लागली. पण नीरज तसे करण्यास तयार नव्हता. आजतकने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.

शेवटी गळा दाबून केली हत्या 

महिलेसबोत लग्न केले असले तरी नीरजला घरापासून दूर लिव्ह इनमध्ये राहायचे होते. याबाबत मृत महिलेच्या बहिणीने सविस्तर माहिती दिलेली आहे. महिला घरी जाण्यासाठी वारंवार हट्ट धरू लागली. परिणामी संताप अनावर झाल्यामुळे आरोपी नीरजने महिलेचा गळा दाबून खून केला. या घटनेची माहिती होताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. महिलेचा खून केल्यानंतर आरोपी नीरज सध्या फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे. दरम्यान, मृत महिलेच्या अवैध संबंधाबाबत माहिती मिळाल्यानंतर नाशिकमध्ये राहणाऱ्या पतीने या महिलेपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता.

इतर बातम्या :

Nashik Crime | नाशिकमध्ये अवैध शस्त्रसाठा जप्त; पिस्तुल, काडतुसे, एअरगन, चॉपर, अग्निशस्त्रासह संशयितांना बेड्या

Palghar Accident | बीचवर अपघाताचा थरार, भरधाव कारने सहा पर्यटकांना चिरडलं, एकाचा मृत्यू 5 जणांची प्रकृती चिंताजनक

Crime | जिगोलो बनण्याची हौस पडली महागात, मोठी फसवणूक होताच तरुणाची पोलिसात धाव, नेमकं काय घडलं ?

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.