बदलापूरची घटना ताजी असतानाच यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीचा नाल्यात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय

यवतमाळमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता होती. तिच्या कुटुंबियांकडून तिचा प्रचंड शोध सुरु होता. या मुलीचा आज संशयितरित्या नाल्यात मृतदेह आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

बदलापूरची घटना ताजी असतानाच यवतमाळमध्ये अल्पवयीन मुलीचा नाल्यात आढळला मृतदेह; घातपाताचा संशय
Follow us
| Updated on: Aug 20, 2024 | 7:27 PM

बदलापुरात दोन चिमुरडींवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पीडित चिमुकलींवर शाळेत सफाई कर्मचाऱ्यांकडून अत्याचार करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संतप्त बदलापूरकरांनी आज तब्बल 10 तास रेल्वे सेवा ठप्प केली. या घटनेमुळे वातावरण तापलेलं असताना आता यवतमाळमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील एका गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृतदेह आढळला आहे. ही मुलगी गेल्या 2 दिवसांपासून बेपत्ता होती. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात याबाबत माहिती दिली होती. मुलीचा शोध सुरु होता. या दरम्यान तिचा मृतदेह आज नाल्यात आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या दोन दिवसापासून अल्पवीयन मुलगी ही बेपत्ता होती. तिच्या कुटुंबीयांनी तिचा प्रचंड शोध घेतला. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली. पण मुलीचा शोध लागत नव्हता. त्यामुळे मुलीचे कुटुबिय प्रचंड चिंतेत होते. अखेर ज्याची भीती होती तेच घडलं. मुलीचा मृतदेह आज गावालगतच्या नाल्यात आढळला. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्या की घातपात? पोलिसांकडून तपास सुरु

मुलीचा मृतदेह आज सकाळी नाल्यात आढळला आहे. गावालगत असलेल्या नाल्यावर सकाळी मासे पकडण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला तिचा मृतदेह नाल्याच्या पाण्यात तरंगताना आढळून आला. त्याने लगेचच या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहाची पाहणी केली. तिने आत्महत्या केली की तिचा घातपात झालाय? याचा शोध पोलीस घेत आहेत.

पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?
खातेवाटपानंतर पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच, कोणत्या जिल्ह्यात स्पर्धा?.
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?
महायुतीचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणत खातं?.
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा
250 कोटींचा पीकविमा घोटाळ्याचा पॅटर्न, धस अण्णा यांचे मुंडेंवर निशाणा.
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप
'माझ्या मुलाचा मर्डर..', सोमनाथ सूर्यवंशीच्या आईच्या पवारांसमोरच संताप.
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?
Mumbai Boat Accident कसा झाला, त्याला जबाबदार कोण?.
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप
'दादा, त्याला मंत्रिमंडळातून काढा..',अजित पवारांसमोर गावकऱ्यांचा संताप.
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.