पाच महिन्यांपूर्वी लग्न, पत्नीसह केदारनाथला जाण्याचं स्वप्न, पण झोपेत असताना काहीतरी घडलं, सोलापूर हळहळलं

उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथून एक दुखद घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या सहाव्या महिन्यातच 26 वर्षीय तरुणाचं निधन झालं आहे.

पाच महिन्यांपूर्वी लग्न, पत्नीसह केदारनाथला जाण्याचं स्वप्न, पण झोपेत असताना काहीतरी घडलं, सोलापूर हळहळलं
मृतक तरुण शिवकुंज कुंभार याचा फोटो
Follow us
| Updated on: Aug 12, 2021 | 7:22 PM

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील अकोलेकाटी येथून एक दुखद घटना समोर आली आहे. लग्नानंतर अवघ्या सहाव्या महिन्यातच 26 वर्षीय तरुणाचं निधन झालं आहे. मृतक तरुणाचं नाव शिवकुंज कुंभार असं होतं. तो नुकतंच 15 फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकला होता. विवाहानंतर अवघ्या पाच महिन्यातच शिवकुंज याच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे तो यावर्षी ऑक्टोबर महिन्यात पत्नीसह केदारनाथला जाणार होता. सर्व गोष्टी सुरळीत असताना अचानक काळाने घाला घातल्याने शिवकुंजचं कुटुंबासह गावकरी हादरले आहेत.

संपूर्ण गावात शोककळा

शिवकुंज आज पहाटे झोपेत असतानाच त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यातच त्याचं निधन झालं. शिवकुंज हा मनमिळाऊ, निर्व्यसनी होता. तो वडिलधाऱ्यांचा आदर करायचा. त्यामुळे गावकरीदेखील हळहळ व्यक्त करत आहेत. संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. शिवभक्त असणाऱ्या शिवकुंज याने सोमवारी (9 ऑगस्ट) म्हणजे श्रावण आरंभाच्या पूर्वसंधेला श्रीक्षेत्र रामलिंग मंदाराचे दर्शन घेतलं होतं.

शिवकुंजच्या अकाली मृत्यूमुळे कुटुंबीय, मित्रमंडळी, नातेवाईकांना धक्का बसला आहे. त्याच्या मृत्यूने अकोलेकाटीत शोककळा पसरली आहे. शिवकुंज याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, लहान भाऊ आहेत.

ऑक्टोबर महिन्यात पत्नीसह केदारनाथ जाण्याचं स्वप्न अधूरं

शिवकुंज हा सोलापूरमधील एका दुकानात काम करायचा. शिवकुंजला पर्यटनाची भारी आवड असल्याने तो नुकतंच जुलैमध्ये बदामी, ऑगस्टमध्ये दांडेली आणि रविवारी रामलिंगची सफर करुन आला होता. त्याने ऑक्टोबर महिन्यात पत्नीसह केदारनाथलाही जाण्यासाठी सर्व ऑनलाईन बुकिंग केले होते. मात्र काळाने आज त्याला हिरावून घेतले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

प्रेयसीच्या हत्येप्रकरणी पकडलं, आरोपी म्हणाला, बायकोलाही 2 वर्षापूर्वी पुरलंय!

नांदेडच्या मुख्य वस्तीत बंदुकीचा धाक दाखवून लुटमार, घटना सीसीटीव्हीत कैद

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.