MP Murder : मध्य प्रदेशात नवस फेडण्यासाठी तरुणाचा नरबळी, तीन मुलींनंतर झाला होता मुलगा

चौकशीदरम्यान आरोपी रामलालने पोलिसांना सांगितले की, त्याला तीन मुली आहेत. त्याने देवीला नवस केला होता की, जर त्याला मुलगा झाला तर तो मनुष्यबळी देईल.

MP Murder : मध्य प्रदेशात नवस फेडण्यासाठी तरुणाचा नरबळी, तीन मुलींनंतर झाला होता मुलगा
दौंडमध्ये अज्ञात कारणावरुन व्यक्तीची हत्याImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 6:18 PM

मध्य प्रदेश : तीन मुलींनंतर मुलगा झाल्यानंतर नवस फेडण्यासाठी एका तरुणाचा बळी दिल्याची घटना मध्य प्रदेशातील रीवा येथे घडली आहे. हे प्रकरण रीवा जिल्ह्यातील बैकुंठपूर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या बेधौवा गावातील आहे. 6 जुलै रोजी पुरातन फुलमती माता मंदिराच्या दारात एका तरुणाचा मृतदेह (deadbody) आढळून आला होता. या तरुणाच्या गळ्यावर मागून कुऱ्हाडीने वार (Att758503ack) करून हत्या (Murder) करण्यात आली होती. दिव्यांश कोल (18) असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. सकाळी गावातील लोकांनी मंदिरात मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपीला अटक (Arrest) करत चौकशी केली असता त्याने धक्कादायक खुलासे केले आहेत.

घटनास्थळी कुऱ्हाड जप्त केली

घटनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बैकुंठपूर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. सिरमौर एसडीओपी नवीन तिवारी एफएसएल युनिट आणि श्वान पथकासह तेथे पोहोचले. तपासादरम्यान घटनास्थळावरुन एक कुऱ्हाड जप्त करण्यात आली आहे. तपासासाठी फॉरेन्सिक टीम आणि सायबर सेलचीही मदत घेण्यात आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी संजय गांधी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला. तपासाअंती हे नरबळीचे प्रकरण असल्याचे निष्पन्न झाले.

मुलगा झाल्यास मनुष्य बळी देण्याचा होता नवस

एसडीओपी नवीन तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामलाल प्रजापती (32) याने नवस पूर्ण करण्यासाठी मानवी यज्ञ केला. चौकशीदरम्यान आरोपी रामलालने पोलिसांना सांगितले की, त्याला तीन मुली आहेत. त्याने देवीला नवस केला होता की, जर त्याला मुलगा झाला तर तो मनुष्यबळी देईल. घरात तीन मुलींनंतर मुलगा जन्माला आल्यावर त्याला नवसानुसार तरुणाचा बळी द्यायचा होचा. तो मुलगा शोधत होता.

हे सुद्धा वाचा

घटनेच्या दिवशी शेळ्या चारणारा हा तरुण त्याला सापडला. निर्जन ठिकाण असल्याने त्याने तरुणाला आपल्यासोबत बेधुआ गावातील देवीच्या मंदिरात आणले आणि कुऱ्हाडीने गळा चिरून हत्या केली. त्यानंतर तो फरार झाला. आरोपी गावात तंत्र-मंत्र आणि भूतविद्याही करतो. याआधीही त्याने मंदिरात हात कापून रक्त अर्पण केले होते. या घटनेमागील अन्य काही कारणे आहेत का याचाही शोध पोलीस घेत आहेत. (Youth killed in Madhya Pradesh due to superstition, Accused arrested)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.