परस्त्रीचा आलेला फोन बायकोने उचलला, रागात पतीने डोक्यात घातला पहार

परस्त्रीचा आलेला फोन बायकोने उचलल्यामुळे भडकलेल्या पतीने तिच्या डोक्यात पहार घातली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

परस्त्रीचा आलेला फोन बायकोने उचलला, रागात पतीने डोक्यात घातला पहार
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 10:38 AM

सोलापूर : सोलापूरमध्ये गुन्ह्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीने मोबाईल कॉल घेतल्याने पतीने डोक्यात पहार घातली. बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे इथं ही घटना घडली. परस्त्रीचा आलेला फोन बायकोने उचलल्यामुळे भडकलेल्या पतीने तिच्या डोक्यात पहार घातली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (husband attack on wife after she picked up phone of another women)

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये पत्नी बालिका संजय चेके जखमी झालू असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर पती संजय दशरथ चेके यांच्याविरुद्ध बार्शी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय मोबाईल घरात ठेवून गेला होता. त्यावेळी एका महिलेचा त्याला फोन आला. पती घरात नसल्यामुळे बालिका यांनी फोन उचलला.

मी घरात नसताना तू फोन का उचललास असा जाब विचारत पतीने तिला मारहाण केली. यावेळी रागाच्या भरात पतीने तिच्यावर प्रहारने हल्ला केला. बालिका या हल्ल्यामध्ये जखमी झाली असून तिच्यावर बार्शीच्या जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी आरोपी पतीला चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. यामध्ये पोलीस घटनेचा अधिक तपास करत असून नेमकं काय घडलं याचा शोध घेत आहे.

इतर बातम्या – 

पती उत्तर प्रदेशचा तर पत्नी बंगालची, तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केलेल्या दाम्पत्याचा संशयास्पद मृत्यू

तरुणाचा मृतदेह डिक्कीत आढळल्याने खळबळ; मित्रानेच पैशांमुळे खून केल्याचा संशय

(husband attack on wife after she picked up phone of another women)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.