लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघा तरुणांना बेड्या

अहमदनगरमधील वाकोडी फाटा भागात असलेल्या 'सनराईज लॉजिंग'मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला

लॉजवरील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, दोघा तरुणांना बेड्या
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:26 AM

अहमदनगर : अहमदनगरमध्ये लॉजवर छापा टाकून पोलिसांनी सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. छापेमारीत दोन तरुणींची सुटका करण्यात आली, तर दोघा जणांना बेड्या ठोकण्यात आल्या (Sex Racket Exposed in Lodge) आहेत.

अहमदनगरमधील वाकोडी फाटा भागात असलेल्या ‘सनराईज लॉजिंग’मध्ये सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने काल रात्री ही कारवाई केली. कारवाई दरम्यान पोलिसांनी दोन तरुणींची सुटका केली.

या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूरमध्ये राहणाऱ्या 27 वर्षीय प्रकाश धनाजी सपकाळ आणि 27 वर्षीय रामेश्वर आप्पासाहेब पाटील यांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणी स्त्रिया आणि मुली यांच्या अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायदा 1956 चे कलम 3.4.5.7.8 प्रमाणे भिगार कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही : हायकोर्ट

दरम्यान, अविवाहित जोडप्याने हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा नाही, असा निकाल मद्रास उच्च न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच दिला होता. परंतु परस्पर संमतीने अशा जोडप्याने एकत्र राहणं कायदेसंमत आहे.

काय आहे निकाल?

‘विरुद्धलिंगी अविवाहित जोडप्यांना अतिथी म्हणून हॉटेलच्या रुमचा ताबा घेण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा किंवा नियम अस्तित्वात नाही. दोन सज्ञान व्यक्तींमधील लिव्ह इन रिलेशनशीप हे कायद्याच्या चौकटीत मोडत नाहीत. त्यामुळे अशा दोन सज्ञान अविवाहित व्यक्तींनी (महिला आणि पुरुष) जोडपे म्हणून हॉटेलमध्ये एकत्र राहणे गुन्हा ठरु शकत नसल्याचं मद्रास हायकोर्टाने स्पष्ट केलं. त्यामुळे अविवाहित स्त्री-पुरुष युगुलाला रुम नाकारणाऱ्या हॉटेलांना दणका मिळाला आहे.

Sex Racket Exposed in Lodge

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.