AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विरारमध्ये जबरी चोरीचा 6 दिवसात छडा, 4 कोटीची रोकड घेऊन पळालेले चोरटे पकडले

चोरट्यांनी तब्बल 4 कोटी 25 लाख रुपये पळवले होते. या रकमेपैकी 4 कोटी 23 लाख 29 हजार 100 रुपये एवढी रक्कम चोरट्यांकडून परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे (Virar Police arrest cash van driver who looted ATM money).

विरारमध्ये जबरी चोरीचा 6 दिवसात छडा, 4 कोटीची रोकड घेऊन पळालेले चोरटे पकडले
| Updated on: Nov 18, 2020 | 6:57 PM
Share

मुंबई : विरारमधील बोळींज येथे कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे टाकणारी व्हॅन पळवून नेल्याची घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली. या चोरीच्या घटनेचा पोलिसांनी अवघ्या सहा दिवसात छडा लावला आहे. चोरट्यांनी तब्बल 4 कोटी 25 लाख रुपये पळवले होते. या रकमेपैकी 4 कोटी 23 लाख 29 हजार 100 रुपये एवढी रक्कम चोरट्यांकडून परत मिळवण्यात पोलिसांना यश आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. मीरा-भाईंदर आणि वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे (Virar Police arrest cash van driver who looted ATM money).

मागच्या आठवड्यात दिवाळीच्या पूर्व संध्येला (12 नोव्हेंबर, गुरुवारी) रायडर्स बिझनेस लि कंपनीची व्हॅन विरार पश्चिमेकडील बोळीज भागात असलेल्या कोटक महिंद्रा बँकेत पैसे भरण्यासाठी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास आली. रायडर कंपनीचे कंत्राट असलेल्या कॅश व्हॅनमध्ये 4 कोटी 58 लाख रुपयांची रोख रक्कम होती. त्यातील आजूबाजूच्या तीन एटीएममध्ये 28 लाख रुपये भरण्यात आले होते. त्यानंतर सव्वा चार कोटी रुपये गाडीत होते.

संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी कॅशव्हॅन आली. गाडीतील मॅनेजर, लोडर आणि बॉडिगार्ड उतरल्यावर गाडी पार्किंग करण्याच्या बहाण्याने ड्रायव्हर आरोपी कॅश व्हॅनसह पळून गेला. त्याला फोन लावण्याचा प्रयत्न केला, पण तो उडवाउडवीचे उत्तर देत होता. नंतर त्याने चक्क आपला फोनच बंद करून ठेवला.

चालकाचा फोन बंद होताच व्हॅनमधील इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ विरार पोलिसांना याबात माहिती दिली. पोलिसांनी आयुक्तालयाशी संपर्क साधून पालघर, ठाणे शहर, ठाणे ग्रामीण, मुंबई शहर, तसेच महाराष्ट्र राज्य डिजी कंट्रोलला फोन करुन सर्व ठिकाणी नाकाबंदी सुरू केली (Virar Police arrest cash van driver who looted ATM money).

दरम्यान व्हॅन चालक भिवंडी जवळ कल्याण नाका परिसरात बेवारस अवस्थेत व्हॅन सोडून जेवढी जमेल तेवढी रक्कम घेऊन फरार झाला. शुक्रवारी सकाळी एमएच 43 बीपी 4976 या नंबरची कॅशव्हॅन भिवंडी कल्याण बायपास रोडच्या बाजूला असल्याची माहिती खबऱ्याने ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार प्रकाश साईल, संतोष सुर्व्हे यांना दिली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांना याबाबत माहिती देऊन ते व्हॅनजवळ पोहोचले. त्यांनी अर्नाळा पोलिसांशी संपर्क साधून माहिती दिली.

कॅशव्हॅन ही सेन्सरने लॉक असल्याने बँकेचे अधिकारी आणि अर्नाळा पोलिसांना कल्याण नाका परिसरात जावं लागलं. कॅशव्हॅनमध्ये चोरी झालेल्या 4 करोड 25 लाखांपैकी 2 करोड 33 लाख 60 हजारांच्या पाचशे, दोनशे आणि शंभरच्या नोटांची रक्कम असलेले बंडल सापडले. तर 1 करोड 91 लाख 40 हजारांचे दोन आणि पाचशेच्या नोटांचे बंडल घेऊन आरोपी ड्रायव्हर पळाला होता. पोलिसांनी शिल्लक कॅशसह व्हॅन ताब्यात घेऊन आरोपीचा शोध सुरू केला. अखेर आरोपीचा शोध घेण्यातही पोलिसांना यश आलं.

संबंधित बातमी :

एटीएममध्ये पैसे टाकण्यासाठी आलेली व्हॅन पळवली, व्हॅन चालकानेच 4 कोटींवर डल्ला मारल्याचा अंदाज

दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?.
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट.
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं.
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?.
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?.
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?
मुंडेंची दिल्लीवारी, शहांची भेट, कोकाटेंच्या प्रकरणानंतर पुन्हा संधी?.
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?
सना मलिकांकडून वडील मलिकांची पाठराखण, NCP महायुतीत सामील होणार की..?.