Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

धक्कादायक…! खासगी शिकवणीच्या शिक्षकाने फोडला बारावी केमिस्ट्रीचा पेपर!

राज्यामध्ये बारावीचे पेपर सध्या सुरू आहेत. परीक्षेदरम्यान (Exams) कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडू नये. यासाठी बोर्डाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, असे असताना देखील मुंबईमध्ये (Mumbai) केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

धक्कादायक...! खासगी शिकवणीच्या शिक्षकाने फोडला बारावी केमिस्ट्रीचा पेपर!
बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर मुंबईमध्ये लिकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 14, 2022 | 12:17 PM

मुंबई : राज्यामध्ये बारावीचे पेपर सध्या सुरू आहेत. परीक्षेदरम्यान (Exams) कोणताही पेपर फुटीचा प्रकार घडू नये. यासाठी बोर्डाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. मात्र, असे असताना देखील मुंबईमध्ये (Mumbai) केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. शनिवारी बारावीच्या विद्यार्थ्यांचा केमिस्ट्री पेपर होता. राज्यामध्ये इतर ठिकाणी हा पेपर सुरळीत पार पडला. परंतू मुंबईमधील विलेपार्ले परिसरातील साठे कॉलेजमध्ये पेपर फुटीची घटना उघडकीस आली आहे. मात्र, शिक्षण मंत्र्यांनी पेपर फुटल्याचा आरोप खोडून काढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे केमिस्ट्रीचा (Chemistry) जो पेपर लिक झाला आहे, तो चक्क एका व्हाट्सअप ग्रुपवर. या व्हाट्सअप ग्रुपमध्ये जवळपास 17 विद्यार्थी असल्याचे बोलले जात आहे. यामुळे हे रॅकेट मोठे असल्याचे देखील बोलले जात आहे.

मुंबईमध्ये केमिस्ट्रीचा पेपर लिक

मालाड परिसरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनीचे परीक्षा सेंटर विलेपार्ले येथील साठे आले होते. ही 17 वर्षांची विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी वर्गामध्ये उपस्थित नव्हती. याचदरम्यान परीक्षा सेंटरवर एका सुपरवायझर शिक्षकांला बाथरूममधून आवाज आला. या शिक्षकांने चेक केले असता त्याला बाथरूममध्ये एक विद्यार्थिनी दिसली. यामुळे शिक्षकाने तिची चाैकशी केली असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे शिक्षकाच्या मनात शंका निर्माण झाली आणि अधिक चाैकशी केली असता विद्यार्थिनीच्या मोबाईलमध्ये केमिस्ट्रीच्या पेपर लिक झाल्याचे शिक्षकांच्या लक्षात आले.

खाजगी शिकवणीच्या मालकाला अटक

या प्रकरणी गुन्हा दाखल होताच विलेपार्ले पोलिसांनी मालाडच्या एका खाजगी शिकवणीच्या मालकाला ताब्यात घेतल्याचे कळते आहे. या खाजगी शिकवणीच्या मालकाचे नाव मुकेश धनसिंग यादव आहे आणि यालाच पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी तीन विद्यार्थिनींची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली असून चौकशीनंतर त्या मुलींना सोडून देण्यात आल्याचे कळते. विद्यार्थिनीचा मोबाईल सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिस सध्या पुढील चाैकशी करत आहेत. या शिकवणी चालकाकडे केमिस्ट्रीचा पेपर कसा आला आणि हा पेपर मिळवण्यासाठी याने किती पैसे मोजले याची संपूर्ण चाैकशी सध्या सुरू आहे.

पेपर फुटला नसल्याचा शिक्षणमंत्र्यांचा दावा!  

मुंबईमधील साठे कॉलेजमध्ये पेपर फुटला नसल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे. पेपर फुटला, असा चुकीचा प्रचार काही समाजमाध्यामातून सुरू असल्याचे शिक्षणमंत्र्याचे म्हणणे आहे. याप्रकरणात शिक्षणमंत्री यांनी विधानपरिषदेमध्ये ही माहिती देत निवेदन दिल आहे.

संबंधित बातम्या : 

कल्याण डोंबिवली महापालिकेत विविध पदांसाठी भरती, थेट मुलाखतीद्वारे निवड

Bank Jobs : बँक ऑफ बडोदामध्ये स्पेशालिस्ट ऑफिसरची भरती, 48 ते 89 हजारांपर्यंत पगाराची संधी

संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर
संतोष देशमुख प्रकरण; आरोपी विष्णु चाटेबद्दल मोठी अपडेट आली समोर.