Job Alert : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक, राज्यात शिक्षकांची मेगा भरती

teachers recruitment : राज्य सरकारने शिक्षण क्षेत्रासंदर्भात महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शाळांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागा त्वरित भरण्यात येणार आहे. महिन्याभरात ही प्रक्रिया सुरु होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी हा निर्णय जाहीर केला.

Job Alert : शिंदे सरकारचा मास्टरस्ट्रोक, राज्यात शिक्षकांची मेगा भरती
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 10, 2023 | 1:48 PM

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी कर्मचारी आणि शिक्षक जुन्या पेन्शन योजनेवरुन सरकारवर नाराज आहे. विधान परिषद निवडणुकीत शिक्षक मतदार संघात भाजप-शिवसेना युतीला फटका बसला होता. आता शिक्षकांमधील नाराजी दूर करण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. राज्यात शिक्षकांची मेगा भरती करण्यात येणार आहे. ही भरती नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात शिक्षक भरती करणार असल्याची घोषणा केली. ही भरीत म्हणजे शिंदे सरकारचा मास्टर स्ट्रोक मानला जात आहे.

किती शिक्षकांची भरती

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले की, पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला सुमारे 30,000 शिक्षकांची भरती केली जाईल. भरती प्रक्रियेत सध्याच्या आरक्षणाचे नियम पाळले जातील. भरतीसाठी मुलाखतीही घेण्यात येतील. राज्य शालेय शिक्षण विभागाकडून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती करणार असल्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी सांगितले. आम्ही या वर्षी जूनमध्ये नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्रक्रिया पूर्ण करू, असा दावाही त्यांनी केला.

हे सुद्धा वाचा

दुसऱ्या टप्प्यात 20,000 शिक्षकांची भरती

दुसऱ्या टप्प्यात आणखी 20,000 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीनंतर दुसऱ्या टप्प्यात किती शिक्षकांची भरती करायची आहे, याचा निर्णय घेतला जाईल, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

किती पदे रिक्त

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील अंदाजे 27 हजार, आणि माध्यमिक शाळेतील अंदाजे 13 हजार अशी एकूण 40  हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत, असा दावा शिक्षक संघटनांकडून केला जातो.  आता त्यातील तीस हजार पदे भरण्यात येणार असल्यामुळे शिक्षकांवरील अतिरिक्त ताण कमी होणार आहे.

केंद्र सरकार आदिवासी समुदायाच्या विकासासाठी ७४० एकलव्य मॉडल स्कूल स्थापन केले जाणार आहेत. ३८ हजार ८०० शिक्षकांची भरती केली जाणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी नॅशनल डिजीटल लायब्ररीसह काही योजना जाहीर केल्या. यात प्रामुख्याने ७४० एकलव्य मॉडलच्या स्कूल सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय जाहीर केला होता.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.