Amravati School Reopen : अमरावतीमध्ये शाळा कॉलेज सुरु करण्यास परवानगी, सार्वजनिक सुट्टीमुळं उद्यापासून वर्ग भरणार

कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं शाळा (School Reopen) महाविद्यालय पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

Amravati School Reopen : अमरावतीमध्ये शाळा कॉलेज सुरु करण्यास परवानगी, सार्वजनिक सुट्टीमुळं उद्यापासून वर्ग भरणार
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Feb 07, 2022 | 1:38 PM

अमरावती : जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात कोरोना (Corona) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत असल्यानं महाविद्यालय आणि शाळा बंद करण्यात आल्या होत्या. कोरोना विषाणू संसर्ग कमी झाल्यानं शाळा (School Reopen) महाविद्यालय पुन्हा करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्यातील पहिली ते बारावीचे वर्ग 24 जानेवारीपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अमरावती (Amaravati) जिल्ह्यात कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने बंद करण्यात आलेल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि पदवी , पदव्युत्तर महाविद्यालये आज ७ फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. अमरावतीच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून यासंदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे शाळा , महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने गजबजणार आहेत जिल्ह्यात 2897 शाळांची संख्या असून 449226 विद्यार्थी संख्या आहे

पहिली ते चौथीचे ऑफलाईन शिक्षण बंद राहणार

अमरावती जिल्ह्यातील कोविड प्रतिबंधक उपाययोजनेच्या अनुषंगाने बंद करण्यात आलेल्या पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा आणि पदवी , पदव्युत्तर महाविद्यालये आज पासुन सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. आजपासून शाळा, महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने पुन्हा गजबजणार आहेत. कोरोना संसर्ग व ओमिक्रॉनचे संकट कमी होत असल्याने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र , पहिली ते चौथीपर्यंत ऑफलाईन शिक्षण बंद असणार आहे परंतु , ऑनलाईन शिक्षणास परवानगी देण्यात आली आहे .

कोरोना नियमांचं पालन करावं लागणार

जिल्हाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशानुसार जिल्ह्यातील शासकीय , निमशासकीय , खासगी व्यवस्थापनाच्या पाचवी ते बारावीपर्यंत शाळा , पदवी व पदव्युत्तर 118 महाविद्यालये कोरोना नियमांचे पालन करून सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना मास्कचा वापर करावा लागणार आहे. गर्दी होणार नाही, याची काळजी शाळांना घ्यावी लागणार आहे. महापालिका क्षेत्र , तसेच ग्रामीण भागातील सर्व प्रकारच्या शासकीय , निमशासकीय व खासगी शाळांतील इयत्ता पाचवी ते बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरू होणार आहेत. प्रशासनाला वर्ग खोल्या सॅनिटाईज कराव्या लागतील . जिल्ह्यात 2897 शाळांची संख्या असून 449446 विद्यार्थी संख्या आहे.

आज सुट्टी उद्यापासून वर्ग भरणार

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली असल्यानं उद्यापासून वर्ग भरणार आहेत.

इतर बातम्या:

दहावी, बारावीच्या परीक्षा सरावासाठी प्रश्नपेढी; विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे शालेय शिक्षण मंत्र्यांचे आवाहन

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं, बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येणार : वर्षा गायकवाड

Amaravati School Reopen Collector gave permission to start college and school classes starts from tomorrow

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....