BMC School: मुख्याध्यापक नेतृत्व कौशल्य प्रशिक्षणा! बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्याचे धडे

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटन देखील करण्यात आले.

BMC School: मुख्याध्यापक नेतृत्व कौशल्य प्रशिक्षणा! बृहन्मुंबई महानगरपालिका शाळेच्या मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्याचे धडे
BMC school Training ProgramImage Credit source: TV9 marathi
Follow us
| Updated on: Jul 22, 2022 | 1:28 PM

मुंबई: मुख्याध्यापक हा शाळा (School) आणि प्रशासन यांना जोडणारा दुवा असतो. ‘जसा मुख्याध्यापक, तशी शाळा’ हे वास्तव असते. त्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Schools) शाळांमधील मुख्याध्यापकांच्या नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, एकप्रकारे शाळांचा मुख्याधिकारी म्हणूनच त्यांनी सर्वतोपरी भूमिका बजावावी, यासाठी नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण महत्त्वाचे आहे, असे उद्गार अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) श्रीमती आश्विनी भिडे यांनी काढले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील मुख्याध्यापकांना जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् यांच्याद्वारे नेतृत्व विकासासाठी प्रशिक्षण (Training) देण्यात येणार आहे. त्यासाठी महानगरपालिकेचा शिक्षण विभाग आणि जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला, त्यावेळी श्रीमती भिडे या बोलत होत्या. भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील सभागृहात आयोजित या कार्यक्रमप्रसंगी मुख्याध्यापकांसाठी नेतृत्व कौशल्य कार्यशाळेचे उद्घाटन देखील करण्यात आले. यावेळी महानगरपालिकेच्या वतीने सहआयुक्त (शिक्षण) श्री. अजित कुंभार तर जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् च्या वतीने संचालक डॉ. आर. श्रीनिवास अय्यंगार यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली

मुख्याध्यापक नेतृत्व कौशल्य प्रशिक्षणाविषयी

मुख्याध्यापकांसाठीचे नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण ३ महिन्यात ४० सत्रे व ६० तासांत पूर्ण करण्याचा कृती कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. यामध्ये व्यवस्थापन कौशल्ये व आर्थिक बाबी हाताळणे, विद्यार्थी-पालक-समाज-लोकप्रतिनिधी यांच्याशी सौहार्दपूर्ण वर्तन करणे, संघभावनेतून कामकाज करण्याचे कौशल्य विकसित करणे, स्व-विकास करणे, शिक्षकांना प्रेरणा देणे, शालेय विकासाचा दूरगामी आराखडा तयार करणे, निर्णयक्षमता वाढवणे, प्रशासनात तंत्रज्ञानाचा वापर करणे अशा शालेय विकासासाठी आवश्यक विविध बाबींचा समावेश असणार आहे. या प्रशिक्षणातून मुख्याध्यापकांना एकप्रकारे जणू शाळेचा मुख्य कार्य अधिकारी (सीईओ-CEO) बनविण्याचा व त्यारुपाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेचा देशामध्ये आणखी गौरव वाढावा, यासाठी प्रयत्न करण्याचा महानगरपालिका प्रशासनाचा मानस आहे.

प्रशिक्षण महत्वाचे ठरेल

यावेळी मार्गदर्शन करताना अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये सर्वच घटकांमधील विद्यार्थी शिकतात. त्यातही बहुसंख्य विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. अशा विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून महानगरपालिका वैविध्यपूर्ण उपक्रम राबवते. विद्यार्थ्यांचे वैविध्य, शिक्षण विभागातर्फे राबवले जाणारे उपक्रम, प्रशासकीय कामे अशा सर्व बाबी लक्षात घेतल्या तर मुख्याध्यापकांवर मोठी जबाबदारी येवून ठेपते. अशा स्थितीत त्यांना नेतृत्व कौशल्याचे धडे देणे आवश्यक आहे. मुख्याध्यापकांना नानाविध आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण महत्वाचे ठरेल. त्यामुळे मुख्याध्यापकांच्या व्यक्तिगत विकासासाठी व एकूणच शाळांच्यादृष्टीने देखील ही कार्यशाळा व प्रशिक्षण एक अभिनव उपक्रम आहे, असे श्रीमती भिडे यांनी नमूद केले.

मुख्याध्यापकांनी सक्रिय सहभागी व्हावे

सहआयुक्त (शिक्षण) श्री. अजित कुंभार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांप्रमाणेच शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यासाठी देखील शिक्षण विभाग वेगवेगळे उपक्रम राबवित असतो. त्याचाच एक भाग असलेले नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण हे प्रत्यक्ष कृतीवर आधारित असल्याने मुख्याध्यापकांनी त्यात सक्रिय सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. कुंभार यांनी केले. शिक्षणाधिकारी श्री. राजेश कंकाळ यांनी नमूद केले की, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् सारख्या नामांकित संस्थांद्वारा मुख्याध्यापकांना असे प्रशिक्षण देणारी बृहन्मुंबई महानगरपालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे. तर, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीजचे संचालक डॉ. आर. श्रीनिवास अय्यंगार यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेसोबत मिळून असा उपयुक्त उपक्रम राबवित असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.