CA Topper 2022: मुंबईचं लेकरू देशात पहिलं! मित शहा झाला सीए, टॉपर्स मध्ये येण्याची होती खात्री

CA Topper 2022: या परीक्षेत मुंबईचा मित अनिल (Meet Shah Mumbai)शाह याने देशात पहिला क्रमांक पटकावला. जयपूरचा अक्षत गोयल हा दुसऱ्या तर सुरतची सृष्टी केयुरभाई संघवी ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी(Meet Shah CA Topper 2022) ठरली.

CA Topper 2022: मुंबईचं लेकरू देशात पहिलं! मित शहा झाला सीए, टॉपर्स मध्ये येण्याची होती खात्री
Meet shah CA Topper 2022Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jul 16, 2022 | 9:39 AM

CA Final Result 2022: चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेचा निकाल (CA Final Result 2022) काल जाहीर झाला. आयसीएआय सीए फायनल रिझल्ट 2022 साठी अधिकृत जाहीर केलेली तारीख जाहीर केली नसली, तरी शुक्रवार, 15 जुलै 2022 रोजी निकाल जाहीर केला जाईल, असे अहवालात सुचविण्यात आले होते. आता, आयसीएआय सीए फायनल मे निकाल 2022 सर्वांसाठी icai.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत मुंबईचा मित अनिल (Meet Shah Mumbai)शाह याने देशात पहिला क्रमांक पटकावला. जयपूरचा अक्षत गोयल हा दुसऱ्या तर सुरतची सृष्टी केयुरभाई संघवी ही तिसऱ्या क्रमांकाची मानकरी(Meet Shah CA Topper 2022) ठरली. नाशिकचा साहील समनानी हा देशात पंधरावा आला.

  • मित शाह – 800 पैकी 642 गुण (80.25 टक्के)
  • अक्षत गोयलने 79.88 टक्के
  • सृष्टी संघवी हिने 76.38 टक्के

14 मे ते 29 मे 2022 या कालावधीत सीएची अंतिम परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून 1 लाख 18 हजार 771 विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. विविध शहरांमध्ये 489 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली होती. देशभरातून एकूण 12 हजार 449 विद्यार्थी सीएसाठी पात्र ठरले असल्याची माहिती ‘दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ कडून देण्यात आली. या परीक्षेसाठी बसलेल्या ग्रुप – 1 मधील 66575 विद्यार्थ्यांपैकी 21.99 टक्के म्हणजे 14643 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ग्रुप-2 मधील 29,348 विद्यार्थ्यांपैकी 21.94 टक्के म्हणजे 3,695 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं अभिनंदन!

शहा यांच्या यशाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे अभिनंदन केले. ‘मीतचे यश हे करिअरच्या वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणाऱ्यातरुणांसाठी प्रेरणादायी आहे. पारंपरिक आणि पारंपरिक क्षेत्रांबरोबरच व्यापार, उद्योग क्षेत्रातील सनदी लेखापाल या भागासाठी महत्त्वाचे आहेत,’ असे शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.