CBSE Private Exam 2021: सीबीएसईकडून कंपार्टमेंट परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?

श्रेणी सुधार, कंपार्टमेंट, खासगी आणि पत्राद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपलोड केली गेली आहेत.

CBSE Private Exam 2021: सीबीएसईकडून कंपार्टमेंट परीक्षेचं ॲडमिट कार्ड जारी, डाऊनलोड कसं करायचं?
सीबीएसई
Follow us
| Updated on: Aug 21, 2021 | 4:43 PM

नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई बोर्डानं कंपार्टमेंट परीक्षा 2021 चं प्रवेशपत्र जारी केलं आहे. श्रेणी सुधार, कंपार्टमेंट, खासगी आणि पत्राद्वारे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्र सीबीएसई बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in वर अपलोड केली गेली आहेत. विद्यार्थी त्यांची प्रवेशपत्र नोंदणी क्रमांक, गेल्या वर्षीचा रोल नंबर आणि नाव नोंदवून प्रवेशपत्र डाऊनलोड करु शकतात. सीबीएसईच्या घोषणेनुसार कंपार्टमेंट परीक्षा 25 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर दरम्यान होणार आहे.

कंपार्टमेंट परीक्षेचं अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड कसं करायचं?

स्टेप 1: सर्वप्रथम CBSE च्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर भेट द्या. स्टेप 2: वेबसाइटवर दिलेल्या e-Pareeksha Portal for Various Examination Related Activities for 2021 या लिंकवर क्लिक करा . स्टेप 3: आता अॅडमिट कार्डच्या लिंकवर क्लिक करा. स्टेप 4: तुमचा रजिस्ट्रेशन क्रमांक आणि मागील वर्षाचा रोल नंबर आणि नाव सबमिट करा. स्टेप5: आता अ‌ॅडमिट कार्ड डाऊनलोड करा, प्रिंट आऊट काढून ठेवा

कंपार्टमेंट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली

गेल्या काही वर्षांच्या तुलनेत सीबीएसईची कंपार्टमेंट परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 88 टक्के घटली आहे. दहावीसाठी 17 हजार 636 विद्यार्थ्यांना कंपार्टमेंट परीक्षेसाठी निश्चित करण्यात आलं होतं. गेल्या वर्षी ही संख्या 1.5 लाखांपेक्षा अधिक होती. कंपार्टमेंट परीक्षेचा निकाल 30 सप्टेंबर नंतर जाहीर केला जाणार आहे.

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा कोरोना विषाणू संसर्गामुळं रद्द करण्यात आल्या होत्या. पर्यायी मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आले आहेत. श्रेणी सुधारण्यासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसांठी नोंदणी प्रक्रिया 10 ऑगस्टपासून सुरु झाली होती.  केवळ 19 विषयांचे पेपर आयोजित केले जाणार आहेत.

सीबीएसईचा बारावीचा निकाल

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 29 जुलै रोजी सीबीएसई 12 वीचा निकाल 2021 जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई 12 वीचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. या वर्षी 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के आहे, तर मुलांचा निकाल 99.13 टक्के आहे.

इतर बातम्या:

CBSE 10th Result 2021Declared: सीबीएसईचा दहावीचा निकाल कसा आणि कुठे पाहायचा? वाचा सविस्तर

CBSE class 12th Result : सीबीएसईचा बारावीच्या निकालावर असमाधानी विद्यार्थ्यांना दिलासा, ऑफलाईन परीक्षेची घोषणा

CBSE Private Exam Admit Card Released for class 10 12 students download from cbse nic in

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.