केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी, पहिल्या ‘पाच’ मध्ये या राज्यांचा समावेश

रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शिक्षणाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी दिली आहे. Ramesh Pokhriyalal

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांकडून परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी, पहिल्या 'पाच' मध्ये या राज्यांचा समावेश
रमेश पोखरियाल निशंक
Follow us
| Updated on: Jun 06, 2021 | 1:35 PM

नवी दिल्ली: केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शिक्षणाच्या विकासाचा आढावा घेण्यासाठी परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्सला मंजुरी दिली आहे. सन 2019-2020 चा परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स जारी करण्यास केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. पंजाब, चंदीगढ, तामिळनाडू, अंदमान निकोबार आणि केरळला सर्वाधिक ग्रेडिंग इंडेक्स मिळालं आहे. (Central Education Minister Ramesh Pokhriyalal approved release Performance Grading index)

शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्याचा प्रयत्न

परफॉरमन्स ग्रेडिंग इंडेक्स म्हणजेच पीजीआय पहिल्यांदा 2017-18 मध्ये जारी करण्यात आला होता. सरकार या द्वारे देशातील शिक्षण व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली आहे. सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांपैकी अंदमान आणि निकोबार, पंजाब, चंदीगढ, तामिळनाडू आणि केरळमध्ये 2019-20 मध्ये या राज्यांना लेवल II मध्ये पहिली ग्रेड मिळाली आहे.

एनआयओएसच्या बारावीच्या परीक्षा रद्द

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलींगच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी जाहीर केला आहे. एनआयओएसनं 19 मे रोजी दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी बारावीच्या परीक्षा लांबणीवर टाकण्यात आल्या होत्या. सीबीएसई, आयसीएसई पाठोपाठ एनआयओएस बोर्डानं बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

बारावीच्या निकालासाठी दररोज ऑनलाईन मिटींग घ्या

सुप्रीम कोर्टात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यासंबंधी अ‌ॅड. ममता शर्मा यांच्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी पार पडली. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला दोन आठवड्यामध्ये बारावीचा निकाल कसा लावणार हे सांगा, असा अल्टिमेटम दिला आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणासाठी देशातील आणि परदेशातील अभ्यासक्रमांचे प्रवेश महच्वाचे आहेत. तुम्ही तातडीनं निर्णय घ्या, गरज पडल्यास दररोज ऑनलाईन मिटिंग घ्या पण दोन आठवड्यामध्ये निर्णय जाहीर करा, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या:

Maharashtra News LIVE Update | मविआ सरकार काॅमन मिनिमम प्रोग्रामवर चालतं, त्याचं भान ठेवलं तर वाद होणार नाहीत : बाळासाहेब थोरात

दहावीच्या परीक्षा रद्द, आणखी एका बोर्डाचा निर्णय, NIOS च्या बारावीच्या परीक्षा लांबणीवर

(Central Education Minister Ramesh Pokhriyalal approved release Performance Grading index)

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.