AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलाला एअरफोर्स ऑफिसर बनवायचंय का? इथे घ्या अ‍ॅडमिशन, प्रवेशाची प्रक्रिया जाणून घ्या

कुठल्याही विषयात पदवी घेतल्यानंतर पदव्युत्तरसाठी कुठे प्रवेश घ्यायचा, याची चिंता लोकांना सतावत असते. अशाच एका कॉलेजबद्दल आम्ही बोलत आहोत, जिथे अ‍ॅडमिशन मिळणं म्हणजे एअरफोर्समध्ये ऑफिसर होण्याची संधी मोठी आहे. याविषयी जाणून घेऊया.

मुलाला एअरफोर्स ऑफिसर बनवायचंय का? इथे घ्या अ‍ॅडमिशन, प्रवेशाची प्रक्रिया जाणून घ्या
IAFImage Credit source: IAF Instagram
| Edited By: | Updated on: Mar 29, 2025 | 3:17 PM
Share

अनेकदा लोक अशा कॉलेजच्या शोधात असतात जिथून अभ्यास करून आयुष्य सेट केलं जातं. वैद्यकीय पदवीधर झाल्यानंतरही पदव्युत्तर शिक्षण कुठे घ्यायचे, कुठे नोकरीची दाट शक्यता आहे, याची चिंता लोकांना सतावत असते. अशाच प्रकारे आम्ही तुम्हाला भारतीय हवाई दलाच्या एका कॉलेजबद्दल सांगणार आहोत, जिथे अ‍ॅडमिशन मिळणं म्हणजे लष्करात अधिकारी होण्याची शक्यता वाढते. इन्स्टिट्यूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन (IAM) असे या कॉलेजचे नाव आहे.

इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (IAM)

इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन ही भारतीय हवाई दलाची एक प्रमुख संस्था आहे. हे देशातील एरोस्पेस वैद्यकीय अ‍ॅक्टिव्हिटींचे केंद्र आहे. ते केवळ गौरवशाली इतिहासासाठीच ओळखला जात नाही, तर त्याचे भविष्यही अत्यंत आशादायक आहे. या संस्थेची स्थापना 29 मे 1957 रोजी झाली. त्यावेळी ते स्कूल ऑफ एव्हिएशन मेडिसिन म्हणून ओळखले जात होते. पहिले कमांडिंग ऑफिसर विंग कमांडर आर. अरुणाचलम होते.

सैन्यदलातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना एव्हिएशन मेडिसिनचे प्रशिक्षण देणे, एअरक्रूला एव्हिएशन मेडिसिनची माहिती पुरविणे आणि एरोमेडिकल समस्यांवर संशोधन करणे हा या संस्थेच्या स्थापनेचा मुख्य उद्देश होता. याशिवाय HAL ला (हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड) विमानांच्या डिझाइन आणि डेव्हलपमेंटमध्ये ही संस्था तांत्रिक मदत करते.

एअरफोर्स कॉलेजमध्ये प्रवेश पात्रता

इन्स्टिट्यूट ऑफ एरोस्पेस मेडिसिन (आयएएम) मध्ये 2025 ची प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे प्रवेश परीक्षांवर आधारित आहे. ही संस्था एरोस्पेस मेडिसिन क्षेत्रात स्पेशलायझेशन देते आणि 3 वर्षांचा MD प्रोग्राम चालवते. IAM मध्ये MD प्रोग्राममध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांना नीट पीजी परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवार संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात.

MD अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी निवड नीट पीजीमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे केली जाते. संस्थेतील जागांची उपलब्धता आणि उमेदवारांची गुणवत्ता यादी लक्षात घेऊन प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाते. उमेदवाराकडे नीट पीजीमध्ये वैध गुण असणे आवश्यक आहे. इतर आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वैद्यकीय पदवीसंबंधित निकषांची पूर्तता करणे आवश्यक आहे.

शिक्षण कुठेही घेतलं तरी त्याचा अभ्यासक्रम निट समजून घेणं गरजेचं आहे. कारण, आपण अनेकदा मोठे कॉलेज किंवा कॅम्पसचा विचार करतो. पण, फक्त मोठं नाव असून चालत नाही तर आपला अभ्यासही चांगला असावा लागतो. आम्ही तुम्हाला एअरफोर्सविषयी वर माहिती सांगितली आहे. आता या माहितीचा तुम्हाला उपयोग होऊ शकेल.

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.