FYJC Admission : अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण, विशेष फेरीअंतर्गत प्रवेश ‘या’ तारखेपर्यंत सुरु राहणार, वर्षा गायकवाड यांचं ट्विट

सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटला भेट द्यावी. एटीकेटी प्रवेशासाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाणार आहे.

FYJC Admission : अकरावी प्रवेशाच्या तीन फेऱ्या पूर्ण, विशेष फेरीअंतर्गत प्रवेश 'या' तारखेपर्यंत सुरु राहणार, वर्षा गायकवाड यांचं ट्विट
अकरावी प्रवेश
Follow us
| Updated on: Sep 18, 2021 | 10:25 AM

मुंबई: अकरावी प्रवेशाच्या तिसऱ्या नियमित फेरीच्या प्रवेशाची मुदत संपली असून आता विशेष फेरीअंतर्गत महाविद्यालयीन कोट्यातून प्रवेश सुरु होतील. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. नियमित फेरीअंतर्गत पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रियेअंतर्गत 2 लाख 14 हजार 806 विद्यार्थ्यांनी अकरावीला प्रवेश घेतला आहे. विशेष फेरीचे प्रवेश 25 सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत. विद्यार्थ्यांनी विशेष फेरीअंतर्गत प्रवेश घ्यावेत, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत.

अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या तीन फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर आता विशेष फेरी सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांनी विशेष फेरीसाठी अर्जात बदल करुन घ्यावेत, असं आवाहन वर्षा गायकवाड यांनी केलं आहे. अकरावी प्रवेशासाठीची तिसरी फेरी 25 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. सविस्तर माहितीसाठी विद्यार्थ्यांनी अकरावी प्रवेशाच्या वेबसाईटला भेट द्यावी. एटीकेटी प्रवेशासाठीचं वेळापत्रक नंतर जाहीर केलं जाणार आहे.

जात प्रमाणपत्र सादर करण्यासंदर्भात दिलासा

मुंबई महानगर विकास प्राधिकरण, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, अमरावती , नाशिक येथील प्रवेश प्रक्रिया केंद्रीय प्रवेश पद्धतीनं सुरु आहे. अकरावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेताना जात प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यानं अडचणी निर्माण होत होत्या. शालेय शिक्षण विभागानं यासंदर्भात दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जात प्रमाणपत्र नसेल ते विद्यार्थी तात्पुरत्या स्वरुपात वडिलांचं जात प्रमाणपत्र सादर करु शकतात, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली होती.

30 दिवसात जात प्रमाणपत्र सादर करावं लागणार

अकरावीसाठी आरक्षित प्रवर्गातून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. सुरुवातीला विद्यार्थी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्ज केल्याची पोहोच किंवा ती उपलब्ध नसल्यास वडिलांच्या जात प्रमाणपत्राची प्रत सादर करुन प्रवेश निश्चित करु शकतात. प्रवेश निश्चित करणारे विद्यार्थ्यांना 30 दिवसांच्या मुदतीत जात प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक आहे. जे विद्यार्थी प्रमाणपत्र सादर करणार नाहीत, त्यांचा प्रवेश रद्द होऊ शकतो. मागासवर्गीय विद्यार्थी खुल्या प्रवर्गातून अर्ज करतील त्यांना जात प्रमाणपत्र सादर करणं बंधनकारक नाही.

महाविद्यालय अलॉट झालं का कसं तपासायचं?

स्टेप 1 : अकरावी प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांनी प्रथम https://11thadmission.org.in या वेबसाईटला भेट द्यावी.

स्टेप 2: नोंदणीवेळी मिळालेला रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड नोंदवून लॉगीन करा

स्टेप 3 : लॉगीन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रवेशाचा तपशील पाहायला मिळेल

स्टेप 4 : वेबसाईटवरील चेक अलॉटमेंट स्टेटस वर क्लिक करा

स्टेप 5 : तुम्हाला महाविद्यालय अलॉट झालं असेल तर त्याचं ना तुम्हाला स्क्रिनवर पाहायला मिळेल

इतर बातम्या :

भाजपला 4 राज्यांत धडा मिळाला, गुजरातसह 3 राज्यांचे मुख्यमंत्री बदलले, मोदी-नड्डांनी दुरुस्तीचं काम हाती घेतलं : संजय राऊत

पुणे पोलीस दलात भरती, शिपाई पदासाठी 5 ऑक्टोबरला लेखी परीक्षा, जाणून घ्या हॉलतिकीट कधी मिळणार?

FYJC Special round admission started Varsha Gaikwad appeal to students fix their Admission

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.