CBSE 12th Result 2021 : बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, जाणून घ्या कसा आहे यंदाचा निकाल

मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 0.54 चांगली आहे. 70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 95 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले. त्याचबरोबर यावर्षी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळाले आहेत.

CBSE 12th Result 2021 : बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी, जाणून घ्या कसा आहे यंदाचा निकाल
बारावीच्या परीक्षेत मुलींची बाजी
Follow us
| Updated on: Jul 30, 2021 | 3:49 PM

CBSE Class 12 Result 2021 Declared नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने शुक्रवारी सीबीएसई 12 वीचा निकाल 2021 जाहीर केला आहे. यंदा सीबीएसई 12 वीचा निकाल 99.37 टक्के लागला आहे. या वर्षी 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. मुलींचा निकाल 99.67 टक्के आहे, तर मुलांचा (CBSE 12th Result 2021) निकाल 99.13 टक्के आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी 0.54 चांगली आहे. 70,000 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 95 टक्केपेक्षा जास्त गुण मिळवले. त्याचबरोबर यावर्षी सुमारे दीड लाख विद्यार्थ्यांना 90 टक्के गुण मिळाले आहेत. इयत्ता दहावी, अकरावी आणि पूर्व-बोर्ड परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले गेले आहे. दहावी बोर्ड परीक्षेच्या आधारावर 30 टक्के गुण दिले जातात, पुढील 30 टक्के गुण 11 व्या इयत्तेच्या आधारावर आणि 40 टक्के गुण 12 वीच्या युनिट, मध्यावधी परीक्षा आणि पूर्व बोर्ड परीक्षांच्या आधारावर दिले जातात. (Girls’ bet in 12th standard exam, know how is this year’s result)

99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

यावर्षी 14,30,188 विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी नियमित विद्यार्थ्यांची संख्या 13,04,561 आहे ज्याचा निकाल जाहीर झाला आहे. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 12,96,318 आहे. 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

कोणत्या संस्थेचा किती निकाल?

1. JNV- 99.94 टक्के 2. KV – 100 टक्के 3. CTSA – 100 टक्के 4. सरकारी – 99.72 टक्के 5. सरकारी सहायता प्राप्त – 99.48 टक्के 6. स्वतंत्र – 99.22 टक्के

खासगी विद्यार्थ्यांची याचिका फेटाळली

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) खासगी, पत्रव्यवहार आणि अन्य कंपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांसाठी 12 वीच्या शारीरिक / ऑफलाईन परीक्षा घेण्यास परवानगी देणाऱ्या 22 जूनच्या निर्णयाविरोधात दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने बुधवारी फेटाळून लावली. न्यायमूर्ती ए.एम. खानविलकर आणि न्यायमूर्ती दिनेश माहेश्वरी यांच्या खंडपीठाने म्हटले आहे की, कोणतीही बाब पुनरावलोकनासाठी तयार केली जात नाही. (Girls’ bet in 12th standard exam, know how is this year’s result)

संबंधित बातम्या

HSC Result date 2021 : महाराष्ट्र बोर्ड 12 वी परीक्षेचा निकाल आता ऑगस्टमध्येच!

CBSE 12th Result 2021 : सीबीएसई निकाल तुमच्या मोबाईलवर कसा मिळेल?

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.