Disale Guruji: शहानिशा करूनच निर्णय घेणार! डिसले यांच्या पगार वसुलीवर झेड.पी.सीईओ दिलीप स्वामी यांची महत्त्वपूर्ण माहिती
Disale Guruji: माढा तालुका (Solapur News) प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे त्यांनी पोस्टाद्वारे आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडून तीन वर्षाचा पगार वसुल करण्यात येणार असल्याचे वृत्त आलं होतं
सोलापूर : ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीतसिंह डिसले त्यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. (Global Teacher Ranjit Singh Disle latest news) माढा तालुका (Solapur News) प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे. प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे त्यांनी पोस्टाद्वारे आपला राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडून तीन वर्षाचा पगार वसुल करण्यात येणार असल्याचे वृत्त आलं होतं याचसंदर्भात झेड.पी. सीइओ दिलीप स्वामी (ZP CEO Dilip Swami) यांनी माहिती दिली आहे. डिसले यांच्या पगार वसुलीचा निर्णय घाईगडबडीने घेणार नसून त्याची शहानिशा करून तपासणी करूनच निर्णय घेणार असं त्यांनी स्पष्ट केलंय.त्याचबरोबर कुठल्याही कर्मचाऱ्यावर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असंही ते म्हणालेत.
शहानिशा करून नियमानुसार कारवाई होईल
रणजितसिंह डिसले यांचा राजीनामा आल्याची माहिती सोलापूर झेड.पी. सीईओ दिलीप स्वामी यांनी दिलीये. रणजीत सिंह डिसले यांचा राजीनामा प्राप्त झाल्याची माहिती मला शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. 6 जुलै रोजी डिसले गुरुजींनी राजीनामा दिलेला आहे. वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचे डिसले यांनी सांगितले. 8 ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करण्याची विनंती डिसलेंनी केली आहे. रणजीतसिंह डिसले यांच्या विरोधात एक अहवाल प्राप्त झाला होता. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्यावरती घाईघाईने अन्याय होऊ नये म्हणून मी दुसऱ्यांदा अहवाल सादर करायला सांगितला. तो अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्येक मुद्द्यावर पुराव्यासह तपासणी करा त्यानंतरच फेरअहवाल सादर करावे असे आदेश मी दिले होते. त्यानंतर नियुक्त केलेल्या समितीचा दुसरा अहवालही प्राप्त झालेला आहे मात्र तो मी पाहिलेला नाही. ज्या पद्धतीने अहवाल येईल त्याची शहानिशा करून नियमानुसार कारवाई होईल. असं झेड.पी. सीईओ दिलीप स्वामी म्हणालेत.
गुरुजींच्या पगार वसुलीबद्दल
सीइओ दिलीप स्वामी यांनी डिसले गुरुजींच्या पगार वसुलीबद्दल सुद्धा सांगितलंय. डिसले यांच्या पगार वसुलीचा निर्णय घाईगडबडीने घेणार नसून त्याची शहानिशा करून तपासणी करूनच निर्णय घेणार असं त्यांनी स्पष्ट केलंय. कोणत्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होणार नाही याची जबाबदारी माझी आहे. जर डिसले गुरुजी गैरहजर असल्याचे आढळले तर त्यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा, जिल्हा परिषद, पंचायत समिती कर्मचारी नियम या नियमातील तरतुदीनुसार त्यांच्यावर कारवाई होईल असं वक्तव्यही सीइओ दिलीप स्वामी यांनी केलंय. रणजीत सिंह डिसले यांनी एक महिन्याची रीतसर नोटीस दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे एक महिन्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राजीनामा मंजूर करण्यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही होईल.