CISCE, ICSE, ISC Result Declared : आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी, असा पाहा तुमचा निकाल…

CISCE, ICSE, ISC Result Declared : आयसीएसई बोर्डाकडून नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल जाहिर करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून या निकालाची विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते. शेवटी आज निकाल जाहिर करण्यात आलाय. या निकालात मुलींनी बाजी मारलीये.

CISCE, ICSE, ISC Result Declared : आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी, असा पाहा तुमचा निकाल...
Result
Follow us
| Updated on: May 06, 2024 | 12:28 PM

कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (CISCE) बोर्डाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा निकाल आज जाहिर करण्यात आलाय. आयसीएसई बोर्डाच्या साईटवर जाऊन विद्यार्थी आपले निकाल पाहू शकतात. 6 मेला सकाळी 11 वाजता हा निकाल जाहिर करण्यात आलाय. results.cisce.org, cisce.org या साईटला जाऊन विद्यार्थी निकाल बघू शकतात. विशेष म्हणजे आयसीएसई बोर्डाचा बारावीचा निकाल सर्वोत्कृष्ट आहे. दक्षिणेकडील प्रदेशात सर्वाधिक उत्तीर्णतेची टक्केवारी म्हणजे 99.53%, त्यानंतर पश्चिम क्षेत्राची 99.32% आहे.

आयसीएसई बोर्डाची इयत्ता 12वीची एकूण उत्तीर्ण टक्केवारी 98.19% आहे. यंदा या परीक्षेत तब्बल 98,088 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दुसरीकडे आयसीएसईच्या दहावी परीक्षेची उत्तीर्ण टक्केवारी 99.47% आहे. यंदा तब्बल 2,42,328 विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. बारावीच्या निकालात मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 98.92% आणि मुलांची टक्केवारी 97.53% आहे.

विशेष म्हणजे यंदाच्या दहावीच्या निकालात मुलींनी बाजी मारल्याचे बघायला मिळत आहे. दहावीमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 99.65% आणि मुलांचे उत्तीर्णतेचे प्रमाण 99.31% आहे. म्हणजे काय तर मुली मुलांपेक्षा अधिक वरचढ ढरल्या आहेत. विभागानुसार देखील टक्केवारी जाहीर करण्यात आलीये. दहावीमध्ये पश्चिम विभागाने बाजी मारलीये.

दहावीच्या निकालामध्ये पश्चिम विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वात जास्त चांगली आहे. पश्चिम विभागाची उत्तीर्णतेची टक्केवारी सर्वाधिक आहे, म्हणजेच 99.91% आणि त्यानंतर दक्षिण क्षेत्र 99.88% आहे. थोडक्यात काय तर यंदा देखील आयसीएसई बोर्डाचा निकाल धमाकेदार लागलाय. 1366 शाळांपैकी सुमारे 66.18% (904) शाळांची उत्तीर्णतेची टक्केवारी 100 हे विशेष आहे.

12वी परीक्षेसाठी 1285 परीक्षा केंद्रे आणि 887 मूल्यमापन केंद्रे होती. दहावी म्हणजेच आयसीएसई परीक्षेत 2695 शाळांनी भाग घेतला होता, ज्यामध्ये 82.48% (2223) शाळांनी 100% उत्तीर्ण होण्याची टक्केवारी मिळवली आहे. आयसीएसईनुसार या परीक्षेसाठी 2503 परीक्षा केंद्रे आणि 709 मूल्यमापन केंद्रे होती. गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे या निकालाची वाट पाहत होते.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.