AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICAI CA Exams 2021: सीएच्या परिक्षेचं काय होणार? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

ICAI CA Exams 2021: CA च्या परीक्षेसंबंधी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. त्यावर सुनावणी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय.

ICAI CA Exams 2021: सीएच्या परिक्षेचं काय होणार? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी
सीए परीक्षा
| Edited By: | Updated on: Jun 29, 2021 | 10:01 AM
Share

नवी दिल्ली : CA च्या परीक्षेसंबंधी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलीय. त्यावर आज सुनावणी होणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय. त्यामुळे सीएच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं, प्रशासनाचं, विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांचं आजच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय. (Important hearing in the Supreme Court today regarding ICAI CA Exam 2021)

ICAI चं म्हणणं नेमकं काय?

कोरोना काळाच्या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टात एक याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेत सीएची परीक्षा एक तर स्थगित करा किंवा परीक्षा केंद्रांची संख्या वाढवा अशी मुख्य मागणी केली गेलीय. यावरच आज सुनावणी होईल. सोमवारी झालेल्या सुनावणीत याचिकेवर माहिती देताना इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया (ICAI)नं कोर्टात सांगितलं की, सध्या कोरोनाच्या केसेस कमी आहेत. त्यामुळेच 5 जुलैला होणाऱ्या परीक्षा रद्द किंवा स्थगित केल्या जाऊ नयेत.

ICAI च्या माहितीनुसार, 3.7 लाख उमेदवारांपैकी 2.8 लाख विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलेलं आहे. एवढच नाही तर परीक्षार्थी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पाऊले उचलल्याचेही ICAI ने म्हटलं आहे. विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टानं नोव्हेंबर 2020 मध्येच ICAI ला परीक्षा घ्यायला मंजूरी दिलेली होती. त्यावेळेस रोज 45 हजार कोरोना केसेस निघत होत्या. आता त्या 48 हजार आहेत. विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिट किंवा प्रवेश पत्रालाच ई पासचा दर्जा केंद्रानं द्यावा, तशी सुचना सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकारला करावी, अशी मागणीही ICAI ने केलीय.

याचिकेत नेमक्या मागण्या काय?

अधिवक्ते सहाय यांच्या याचिकेत परीक्षा केंद्रांची संख्या वाढवण्याची मागणी केली गेलीय. याचिकेत अशी मागणी आहे की, प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी एक परीक्षा केंद्र असावं आणि परीक्षा ही वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजीत केली जावी. जुन्या अभ्यासक्रमावर आधारीत इंटरमेडिएट तसच अंतिम परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी वाढवून द्यावी अशी मागणीही याचिकेत आहे.

तर परीक्षा स्थगित करा

ज्या इतर मागण्या याचिकेत केल्यात त्यात, परीक्षार्थींच्या प्रवासाची, तसच राहण्याची व्यवस्था करण्याच्या सुचना द्याव्यात, जे शिक्षक, कर्मचारी केंद्रांवर तैनात असतील त्यांना कोविडचा डोस देण्यात आलेला असावा, जे परिक्षेला विद्यार्थी येतायत त्यांचही लसीकरण झालेलं असावं, ह्या सगळ्या सुविधा होत नसतील तर मग परिक्षा स्थगित केल्या जाव्यात.

संबंधित बातम्या : 

SBI clerk job notification 2021: स्टेट बँकेत 5 हजार जागांवर बंपर भरती, 49 हजारांपर्यंत पगार

CBSE 12th Board Exam 2021: बारावीच्या परीक्षा होणार की नाही? राज्यांच्या शिक्षणमंत्र्यांनी काय भूमिका घेतली?

(Important hearing in the Supreme Court today regarding ICAI CA Exam 2021)

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.